कोणालाही एक प्रश्न पडेल की जर चीनला जैविक युद्ध करायचेच होते तर त्या व्हायरसचा वापर स्वतःच्या नागरिकांवर का केला..? सर्वात पहिली गोष्ट चिनी राज्यकर्त्यांना चिनी जनतेविषयी जराही आपुलकी नाही. त्यामुळे उद्या जर कोणत्याही देशाने चीनकडे बोटं उगारलं तर चिनी राज्यकर्ते बोलून मोकळे होतील की आमच्या जनतेला आणि चीनच्या अर्थव्यवस्थेलाही फटका बसलाय. एकंदरीत 'सेफ गेम'.
ह्या सगळ्यातून चीनला काय फायदा झाला...??? सध्या व्हाट्सअप्प वर ह्या विषयावर अनेक मेसेजेस फिरत आहेत. चीनने विदेशी कंपन्यांचे शेअर्स कमी किमतीत विकत घेतले. सगळ्या विदेशी कंपन्या चीनच्या नियंत्रणात आल्या. वगैरे वगैरे... मेसेज चुकीचे नाहीत पण आधीच हे मेसेज सगळीकडे पोहोचले आहेत त्यामुळे त्यावर फारसं लिहित नाही. कालच एक बातमी वाचली ती अशी की चीनने स्पेनला ४३२ मिलियन युरो इतक्या किंमतीच्या वैद्यकीय समानाची निर्यात केली. ह्यावरूनच समजत चीन किती तयारीत आहे. पण जर जागतिक महासत्ता बनायचे असेल तर फक्त आर्थिक बाजू मजबूत असून चालत नाही तर सामरिक ताकद आणि व्युहरचनाही तितकीच प्रबळ असायला हवी आणि चीनला ह्याची पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळे ह्या कोरोना प्रकरणामुळे चीनला जे सामरिक फायदे झाले आहेत ते आर्थिक फायद्यांपेक्षा फार मोठे आणि महत्वाचे आहेत. त्याची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी एक वर्ष मागे जावं लागेल.
हे हाँगकाँग प्रकरण जोरात सुरू असताना मी व्हाट्सअप्प वर एक छोटा लेख शेअर केला होता. त्यावेळी मी त्यात काही वाक्य लिहिली होती ती अशी की, हाँगकाँग मधील आंदोलन हे चिनी ड्रॅगनच्या घशात अडकलेला काटा आहे. तो तसाच ठेवता येत नाही आणि काढताही येत नाही, अशी अवस्था झाली होती. तो काटा ड्रॅगन कसा निस्तरतो त्यावर पुढील घटनाक्रम अवलंबून आहे. चीनने तो काटा सहज काढलाय तोही दुसऱ्या जहरी काट्याने. तो जहरी काटा आहे कोरोना व्हायरस. ज्याप्रमाणात चीनमध्ये कोरोनाचा फैलाव होत गेला त्याप्रमाणात हाँगकाँग मधील आंदोलन थंडावत गेलं. आज कुठेही हाँगकाँगच्या आंदोलनाचा शब्दही समोर येत नाही. दुसरा फायदा असा झाला की अमेरिकेसोबत जे व्यापारी युद्ध सुरू होतं तेही काही प्रमाणात थंडावले आहे. त्यामध्ये चीनचे जे काही नुकसान झाले आहे तेही भरून निघत आहे. पण अमेरिका मात्र मेडिकल इमर्जन्सी मध्ये पुरती अडकली आहे आणि अमेरिकेचा आशियातील सर्वात मोठा मित्र देश भारतही. ह्या सर्व घटनांचा अर्थ एकच होतोय तो म्हणजे येणाऱ्या लवकरच्याच काळात चीन शेजारील दोन देशांवर हल्ला करू शकतो. ते सॉफ्ट टार्गेट देश म्हणजे तैवान आणि दक्षिण कोरिया. हे सर्व अमेरिकेतील मेडिकल इमर्जन्सी संपण्याआधी होण्याची शक्यताच जास्त आहे. जेणेकरून अमेरिकेला पूर्ण ताकदीनिशी विरोध करता येणार नाही.
आम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सूचनांचे पालन करायचे. आजही आम्ही युद्धामध्येच आहोत आणि उद्याही युद्धामध्येच असणार आहोत. मला नेहमीच इस्रायली जनतेचे फार कौतुक वाटते. युद्ध असो की इतर आणीबाणी प्रत्येक इस्रायली नागरिक हा एक सैनिक बनतो. अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत. सैनिक बनणे म्हणजे आघाड्यांवर जाऊन बंदूक घेऊन लढायलाच पाहिजे असे नाही. तर लोकनियुक्त सरकारला (मग ते कोणत्याही पक्षाचे असो.!) पूर्ण सहकार्य करणे, हेही लढण्याइतकेच महत्वाचे काम आहे. मित्रांनो, अनेक जण विचारतात की तिसरे महायुद्ध कधी सुरू होणार...??? पुन्हा चुकताय... तिसरे महायुद्ध सुरू होऊन अनेक वर्ष लोटली आहेत. ह्या २०२० सालापासून ह्या तिसऱ्या महायुद्धाचा अंतिम भाग सुरू झालाय जो अजून ४-५ वर्षांनी संपेल. ह्यापुढे लढले जाणारे प्रत्येक युद्ध हे फक्त सीमांवर लढले जाणारे नसेल तर ते तुमच्या आमच्या दारापर्यंत, घराघरात पोहोचलेले असेल. "कोरोना" व्हायरसने हे सिद्ध करून दाखवलंय. प्रत्येक गोष्टीची जबाबदारी सरकारवर टाकून चालणार नाही. युद्धतंत्र बदलत आहेत. ह्यापुढे रात्रच नाही तर दिवसही वैऱ्याचा आहे. येणारे दिवस अजूनही बिकट असू शकतात. त्यामुळे ह्यापुढे आम्ही कसे वागतो, येणाऱ्या कठीण प्रसंगांना एक देश, एक राष्ट्र म्हणून कसे सामोरे जातो ह्यावरच आपल्या भारत देशाचं भवितव्य अवलंबून आहे.
© सुमित शिर्के.




खुप छान सुमित तुझ्यामुळे एवढी माहिती मिळते...
ReplyDelete👍👌
Very well anylised article
ReplyDeleteWell done Sumeetsinh
Always like to read your articles
Keep writing
Shreeram
Sumeet saheb... Great information..!!!👌👌👌👍
ReplyDeleteअत्यंत अभ्यासपूर्ण असे विश्लेषण !
ReplyDeleteHelp to drive thinking streams in proper direction.
Thanks for great information
ReplyDeleteGood observation Sumit.. ambadnyaaa for sharing.
ReplyDeleteMahiti khari asli tari sagle tark chukiche lavlele ahet.
ReplyDeleteहे सर्व माझे तर्क आहेत. ते खरेच होतील असेही नाही. आणि कोणीही साध्याच्या घडीला योग्य तर्क मांडू शकत नाही. परिस्थितीनुसार प्रत्येक देशाची धोरणे पाच पाच मिनिटांनी बदलत आहेत. बघुयात पुढचा येणारा काळच सांगेल काय होईल ते...
Deleteतर्क चुकीचे त्यांना वाटतात ज्यांना चीन चा स्वभाव माहित नाही किंवा चीन विषयी सहानुभूती आहे. चीनची महत्त्वाकांक्षा एकच, अमेरिकेला खाली खेचून संपूर्ण पृथ्वी वर अधिराज्य गाजवने.
DeleteSimply great sinh thnx for great analysis.ambadnya
Deleteखुप अन्याय करून चींन जिंकु शकतो पण थोडे दिवस .....कारण व्हिलन भरपुर ऐश करतो पण शेवटी त्यास सर्वनाश हे सत्य.....
Deleteआपका विचार भोहोत बडीया हे, अपने देश के लिये....🙏🙏🙏🙏🙏
ReplyDeleteSumit, great analysis. Can you please make a video out of this and share on social media? Lot of people need to know this.
ReplyDeleteYes... I am thinking about it.
DeleteGood information. Thanks. Keep it up.
ReplyDeleteKharaye....
ReplyDeleteSunder. great informarion....ambadnya nathsanvidh...for sharing...
ReplyDeleteGreat informative / public awareness of facts by Mr.Sumit Shirke.Hats off.If video of these facts can be introduced n put on social media,that would be highly appreciated. Regards - Vijay.
ReplyDeleteThank you sir....Such great information...Hats off ....How much historical study ....
ReplyDeleteखुप छान माहिती दिल्या बद्दल साधुवाद सुमित शिर्के साहेब, अशीच माहिती पुढे पण मिळत राहिल ही अपेक्षा । वसंत बुधकर , भोपाल
ReplyDeleteखूप सुंदर माहिती शिर्के साहेब......चीनने एक प्रकारे हे तिसरं युद्धच सुरू केलय.... कोरोनाच्या नावांनी....पण आपल्या भारत सरकारला भारतीय जनतेनी योग्य ती मदत केली पाहिजे आणि भारताने चीन पासून सावध राहिले पाहिजे......धन्यवाद...!
ReplyDeleteExpedient information. It shows that you have very good repository of knowledge. Well anylised and linked article.
ReplyDeleteYou are right
ReplyDeleteThanks for giving good information.
ReplyDeleteखुप छान माहिती..अत्यंत अभ्यासपूर्ण असे विश्लेषण !धन्यवाद...!
ReplyDelete