Wednesday, 25 March 2020

रात्रच नाही, दिवसही वैऱ्याचा आहे...

 

               "कोरोना" ह्या नावाभोवती सध्या संपुर्ण जग केंद्रित झालं आहे. चीनमधून सुरू झालेला हा साथीचा आजार आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. कोरोनामुळे संपूर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू झाला आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, मीडिया वेळोवेळी अनेक सूचना करत आहेत. त्यामुळे त्याच गोष्टी मी पुन्हा पुन्हा मी इथे लिहिणार नाही. पण जर तुम्ही "कोविद-१९" हा साथीचा आजार आहे असं समजत असाल तर मात्र तुम्ही चुकत आहात. हा साथीचा आजार नसून "जैविक युद्ध" आहे. चीनने ह्या युद्धतंत्राचा फार शिताफीने वापर केला आहे. जैविक युद्धात बॅक्टेरिया आणि व्हायरसचा वापर होतो. चीनने संपूर्णपणे नवीन अश्या व्हायरसचा वापर केला आहे आणि तोही जलदगतीने संसर्गाने पसरणारा. "जैविक युद्ध" हे अणुयुद्धापेक्षाही घातक परिणाम घडवून आणणारे असते. ह्यामुळे लाखो-करोडो लोक रोगग्रस्त तर होतातच पण त्या राष्ट्राचा आर्थिक आणि सामाजिक समतोल पूर्णपणे ढासळतो.
               कोणालाही एक प्रश्न पडेल की जर चीनला जैविक युद्ध करायचेच होते तर त्या व्हायरसचा वापर स्वतःच्या नागरिकांवर का केला..? सर्वात पहिली गोष्ट चिनी राज्यकर्त्यांना चिनी जनतेविषयी जराही आपुलकी नाही. त्यामुळे उद्या जर कोणत्याही देशाने चीनकडे बोटं उगारलं तर चिनी राज्यकर्ते बोलून मोकळे होतील की आमच्या जनतेला आणि चीनच्या अर्थव्यवस्थेलाही फटका बसलाय. एकंदरीत 'सेफ गेम'.

               चीनचे वुहान शहरामध्ये एक संस्था आहे. वुहान इस्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी. ह्या संस्थेमध्ये वेगवेगळ्या विषाणूंवर संशोधन  येते आणि चीनच्या सरकारी आकडेवारीनुसार १५०० वेगवेगळे व्हायरस ह्या संस्थेमध्ये संवर्धित करून ठेवले आहेत. त्याच वुहान शहरामध्ये कोरोनाचा सर्वप्रथम फैलाव होतो. सुरवातीच्या काळात एक डॉक्टर ह्या व्हायरसबद्दल इतर डॉक्टरांना सावध करतो. त्या डॉक्टरला अटक होते. त्याच्याकडून लिहून घेतलं जातं की असा कोणताही व्हायरस नाही आहे आणि ह्यापुढे अशा अफवा पसरवणार नाही. एकप्रकारे प्रकरण दाबलं जात. पुढे तोच डॉक्टर कोरोनामुळे मरतो. पुढे हा व्हायरस तिथून इटली युरोपपासून अमेरिकेपर्यंत पसरतो. पण चीनचा आर्थिक कणा मनाली जाणारी शांघाय आणि राजधानी बीजिंग ह्या शहरांमध्ये प्रभाव जाणवत नाही. जरी जाणवला तरीही अगदीच नगण्य.  त्यानंतर चीनमध्ये तो व्हायरस नियंत्रित व्हायला सुरुवात होते. ह्याचाच अर्थ काय तर कोरोनाचा संसर्ग सुरू होण्यापूर्वीच  चीनकडे त्याच औषध तयार होते. सगळं कसं चपखल ठरवून घडवून आणल्यासारखं आहे.
               ह्या सगळ्यातून चीनला काय फायदा झाला...??? सध्या व्हाट्सअप्प वर ह्या विषयावर अनेक मेसेजेस फिरत आहेत.  चीनने विदेशी कंपन्यांचे शेअर्स कमी किमतीत विकत घेतले. सगळ्या विदेशी कंपन्या चीनच्या नियंत्रणात आल्या. वगैरे वगैरे... मेसेज चुकीचे नाहीत पण आधीच हे मेसेज सगळीकडे पोहोचले आहेत त्यामुळे त्यावर फारसं लिहित नाही. कालच एक बातमी वाचली ती अशी की चीनने स्पेनला ४३२ मिलियन युरो इतक्या किंमतीच्या वैद्यकीय समानाची निर्यात केली. ह्यावरूनच समजत चीन किती तयारीत आहे. पण जर जागतिक महासत्ता बनायचे असेल तर फक्त आर्थिक बाजू मजबूत असून चालत नाही तर सामरिक ताकद आणि व्युहरचनाही तितकीच प्रबळ असायला हवी आणि चीनला ह्याची पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळे ह्या कोरोना प्रकरणामुळे चीनला जे सामरिक फायदे झाले आहेत ते आर्थिक फायद्यांपेक्षा फार मोठे आणि महत्वाचे आहेत. त्याची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी एक वर्ष मागे जावं लागेल.


               जुलै २०१९ मध्ये तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई-इंग-वेन ह्यांनी अचानक अमेरिका भेट घेलती होती. त्या पॅराग्वेला जात असताना मध्ये अमेरिकेत स्टॉपओव्हर साठी थांबल्या होत्या असे सांगण्यात आले. पण त्या मधल्या काळात त्यांच्या अमेरिकेमध्ये ज्या काही भेटीगाठी झाल्या त्यावरून तरी पॅराग्वेला जाणे हे निमित्त होते असेच समजते. चीनने ही ह्या भेटीवर सडकून टीका केली होती. तैवानच्या राष्ट्राध्यक्षांची आजवरची पहिलीच अमेरिका भेट, दौरा इतका घाई गडबडीत झाला होता. आणि ह्या भेटीनंतर हाँगकाँग मध्ये लोकशाहीवादी आंदोलनांनी जोर धरला. चीन ह्या सगळ्या आंदोलनामध्ये अडकून पडला आणि चीनच्या पुढील सामरिक योजनांना खीळ बसली. त्यातही तैवानच्या राष्ट्राध्यक्षांच्या अमेरिका भेटी आधी चीनने तैवान जवळ लष्करी सरावांची तीव्रता वाढवली होती. ह्या सगळ्या घटनाक्रमाचा सरळ अर्थ असा निघतो की चीनने तैवानवर हल्ला करण्याची सगळी तयारी केली होती. त्याची कुणकुण लागताच तैवानच्या राष्ट्राध्यक्षा घाई गडबडीत अमेरिकेला गेल्या. त्यांनतर अमेरिकेने हाँगकाँग मधील आंदोलनांना पाठबळ देऊन त्याची तीव्रता वाढवली. चीन स्वतःच्याच क्षेत्रीय संघर्षात अडकून पडला. चीनने हाँगकाँग मधील आंदोलनामागे अमेरिकेचा हात आहे असा आरोप केला होता, हेही विसरून चालणार नाही.
               हे हाँगकाँग प्रकरण जोरात सुरू असताना मी व्हाट्सअप्प वर एक छोटा लेख शेअर केला होता. त्यावेळी मी त्यात काही वाक्य लिहिली होती ती अशी की, हाँगकाँग मधील आंदोलन हे चिनी ड्रॅगनच्या घशात अडकलेला काटा आहे. तो तसाच ठेवता येत नाही आणि काढताही येत नाही, अशी अवस्था झाली होती. तो काटा ड्रॅगन कसा निस्तरतो त्यावर पुढील घटनाक्रम अवलंबून आहे. चीनने तो काटा सहज काढलाय तोही दुसऱ्या जहरी काट्याने. तो जहरी काटा आहे कोरोना व्हायरस. ज्याप्रमाणात चीनमध्ये कोरोनाचा फैलाव होत गेला त्याप्रमाणात हाँगकाँग मधील आंदोलन थंडावत गेलं. आज कुठेही हाँगकाँगच्या आंदोलनाचा शब्दही समोर येत नाही. दुसरा फायदा असा झाला की अमेरिकेसोबत जे व्यापारी युद्ध सुरू होतं तेही काही प्रमाणात थंडावले आहे. त्यामध्ये चीनचे जे काही नुकसान झाले आहे तेही भरून निघत आहे. पण अमेरिका मात्र मेडिकल इमर्जन्सी मध्ये पुरती अडकली आहे आणि अमेरिकेचा आशियातील सर्वात मोठा मित्र देश भारतही. ह्या सर्व घटनांचा अर्थ एकच होतोय तो म्हणजे येणाऱ्या लवकरच्याच काळात चीन शेजारील दोन देशांवर हल्ला करू शकतो. ते सॉफ्ट टार्गेट देश म्हणजे तैवान आणि दक्षिण कोरिया. हे सर्व अमेरिकेतील मेडिकल इमर्जन्सी संपण्याआधी होण्याची शक्यताच जास्त आहे. जेणेकरून अमेरिकेला पूर्ण ताकदीनिशी विरोध करता येणार नाही.


               आता ह्या सगळ्याचा आपल्याशी- भारताशी काय संबंध.??? तर संबंध आहे. गेल्या महिन्यात एक घटना समोर आली होती ज्याकडे कोणीही फारसं गंभीरपणे पाहिलं नाही. भारतीय नौदलाने चीनचे मालवाहतूक करणारे एक जहाज ताब्यात घेऊन कांडला बंदरात आणले. त्यात बॅलेस्टिक मिसाईल्स लाँच करण्यासाठी लागणाऱ्या उपकरणांचे सुटे भाग होते. चीन त्यांच्या व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी नेहमी आक्रमक असतो. पण हे जहाज पकडल्यानंतर चीनकडून जहाल प्रतिक्रिया आली नाही. कारण ह्या प्रकरणावरून आंतरराष्ट्रीय संघटनांकडे तक्रार होऊ शकते. म्हणून चीनने नमते धोरण घेतले. पण हे युद्ध साहित्य पाकिस्तानात पाठवून चीन कसली तयारी करत होता...??? एक गोष्ट लक्षात घ्या जरी भारत चीनचा महत्वाचा व्यापारी भागीदार असला तरीही चीनला महासता बनायचं असेल तर भारत हा एकच अडसर ठरतोय. भारताबाबत चीनची भूमिका तुकडे पाडण्याचीच आहे. अनेकदा चिनी वृत्तपत्रांतून भारताचे तुकडे करा अशा प्रकारचे मजकूर छापून आले आहेत. भारताचा अडसर बाजूला करण्यासाठी चीन कोणतीही पातळी गाठू शकतो. भारतात कोरोनाचा फैलाव होणे हे अपेक्षितच होते. परंतु तो थेट चीनमधून न येता इतर देशातून आला. त्यानंतर वैद्यकीय साहित्यांची चीनला होणारी निर्यात राखून भारत सरकारने चीनला योग्य तो संदेश दिलाच आहे. जर तैवान आणि दक्षिण कोरिया चीनच्या ताब्यात आले तर संपुर्ण ईस्ट चायना सी आणि साऊथ चायना सी म्हणजेच संपूर्ण इंडो-पॅसिफिक क्षेत्रावर चीनचे वर्चस्व निर्माण होईल. अशा परिस्थितीत अमेरिकेला एकट्याने चीनचा सामना करणे अवघड जाईल. अशा वेळी अमेरिका भारताकडून सहकार्य मागेल. त्यावेळी पाकिस्तान आणि चीनकडून भारताविरुद्ध संघर्ष सुरू होण्याची दाट शक्यता आहे. हे जर मला-तुम्हांला समजतय तर भारत सरकारला नक्कीच ह्याबद्दल आपल्यापेक्षा जास्त माहीत असणार. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्या सगळ्या गोष्टींसाठी फार आधीपासूनच तयार आहेत. पण मग आम्ही काय करायचं....???
               आम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सूचनांचे पालन करायचे. आजही आम्ही युद्धामध्येच आहोत आणि उद्याही युद्धामध्येच असणार आहोत. मला नेहमीच इस्रायली जनतेचे फार कौतुक वाटते. युद्ध असो की इतर आणीबाणी प्रत्येक इस्रायली नागरिक हा एक सैनिक बनतो. अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत. सैनिक बनणे म्हणजे आघाड्यांवर जाऊन बंदूक घेऊन लढायलाच पाहिजे असे नाही. तर लोकनियुक्त सरकारला (मग ते कोणत्याही पक्षाचे असो.!) पूर्ण सहकार्य करणे, हेही लढण्याइतकेच महत्वाचे काम आहे. मित्रांनो, अनेक जण विचारतात की तिसरे महायुद्ध कधी सुरू होणार...??? पुन्हा चुकताय... तिसरे महायुद्ध सुरू होऊन अनेक वर्ष लोटली आहेत. ह्या २०२० सालापासून ह्या तिसऱ्या महायुद्धाचा अंतिम भाग सुरू झालाय जो अजून ४-५ वर्षांनी संपेल. ह्यापुढे लढले जाणारे प्रत्येक युद्ध हे फक्त सीमांवर लढले जाणारे नसेल तर ते तुमच्या आमच्या दारापर्यंत, घराघरात पोहोचलेले असेल. "कोरोना" व्हायरसने हे सिद्ध करून दाखवलंय. प्रत्येक गोष्टीची जबाबदारी सरकारवर टाकून चालणार नाही. युद्धतंत्र बदलत आहेत. ह्यापुढे रात्रच नाही तर दिवसही वैऱ्याचा आहे. येणारे दिवस अजूनही बिकट असू शकतात. त्यामुळे  ह्यापुढे आम्ही कसे वागतो, येणाऱ्या कठीण प्रसंगांना एक देश, एक राष्ट्र म्हणून कसे सामोरे जातो ह्यावरच आपल्या भारत देशाचं भवितव्य अवलंबून आहे.

© सुमित शिर्के.

Tuesday, 24 March 2020

आरोग्यम् सुखसंपदा भाग - २

               मागच्या लेखामध्ये आपण बघितलं की आरोग्य चांगले असेल, रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर कोणत्याही रोगावर सहज मात करता येते. ज्यांनी पहिला भाग वाचला नाही त्यांच्यासाठी पहिल्या भागाची लिंक ह्या लेखाच्या शेवटी दिलेली आहे. आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राखण्यासाठी काय काय खबरदारी घ्यायला हवी त्याबद्दल आपण डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशींनी केलेलं मार्गदर्शन पाहिलं. त्यातील काही गोष्टी आपण मगच्या लेखात पहिल्या आता पुढील गोष्टी पाहुयात...

६. कढीपत्ता:-
               जेवण बनवताना फोडणीला सगळ्यात आधी कढीपत्ता घातला जातो आणि जेवताना सगळ्यात आधी ताटाबाहेर असतो. आमटी, डाळ, सांबार यांतील जी कढीपत्त्याची पानं आम्ही बाजूला काढून टाकतो त्या कढीपत्त्याचं विज्ञानाने सांगितलेलं महात्म्य जाणून घेणे महत्वाचे आहे. ह्या कढीपत्त्याची रोज पाच ते सहा पानं कच्ची किंवा जेवणातून चावून चावून खाल्ली असता एक वर्षामध्ये त्या मनुष्याच्या शरीरामध्ये अशा प्रकारचे रसायन उत्पन्न होते की ज्याच्यामध्ये कॅन्सरच्या पेशी जन्मल्या जमल्याच त्यांना हतबल करण्याची शक्ती असते. कॅन्सरच्या पेशी प्रत्येकाच्या शरीरात ह्या ना त्या कारणाने बनतच असतात. कढीपत्त्याची पाच ते सहा पानं रोज चावून खाल्ल्याने कॅन्सरला प्रतिबंध होतो, हे सायंटिफिक जर्नल्स सांगतात. ब्रेस्ट कॅन्सर आणि ब्लड कॅन्सर ह्यांच्याबाबतीत परिणामकारकता पन्नास टक्के आहे तर इतर सर्व कॅन्सरच्या बाबतीत ती ऐंशी टक्के आहे. ऐंशी टक्के! एक साधी गोष्ट आम्हांला किती प्रोटेक्शन देऊ शकते. आपण कढीपत्त्याची पानं खायची आहेतच पण लहान मुलांनाही सवय झाली पाहिजे. लहान मुलं खात नसतील तर चटणी बनवून किंवा इतर कोणत्याही पदार्थातून ती पोटत गेली पाहिजेत. पण जास्त फायदा हा चावून खाण्यानेच आहे.

७. शताक्षी प्रसादम् :-
               शताक्षी म्हणजे महिषासुरमर्दिनी चा पाचवा अवतार... सकाळी नाश्ता झाल्यानंतर शताक्षी प्रसादम प्रत्येकाने भक्षण करायचा. हळद, मध, एक चतुर्थांश लसूण पाकळी ठेचलेली, आणि सुंठ ह्यांचा एक छोटासा लाडू, आयुर्वेदिक गोळ्या असतात त्या साईजचा तयार करून गिळून टाकायचा. ह्यातील हळद, मध, लसूण पाकळी, सुंठ ही मनावर आणि प्राणावर कार्य करणारी आहेत. ही द्रव्ये फिजिकल म्हणजेच शरीरावर  तर काम करणारच आहेत पण मनावर,  बुद्धीवर आणि प्राणांवरही काम करणारी आहेत. त्यांच्यामध्ये काही चुकत असेल तर ते नीट करण्याचं कामही हा शताक्षी प्रसादम करणारच. ही एवढीशी छोटी गोळी आम्हांला वाटते पण ही अतिशय आक्रमक आहे आणि जिथे जिथे म्हणून कमजोरी आहे ती दूर करण्याची ताकद ह्या ठिकाणी आहे. शारीरिक, मनोमय आणि प्राणमय देहातील सर्व प्रकारची दुर्बलता दूर करण्याची ताकद ह्या शताक्षी प्रसादम् मध्ये आहे.
               मनुष्याच्या स्वार्थी व बेफिकीर वृत्तीमुळे त्याने प्राचीन काळीसुद्धा आजच्याप्रमाणेच निसर्गावर अनन्वित अत्याचार व अन्यात केलेले आहेत व त्यामुळे निसर्गाचा कोप होऊन अनके वर्षे पर्जन्यवृष्टी थांबली होती. त्यावेळेस ब्रह्मर्षींच्या व अनेक पवित्र ऋषींच्या प्रार्थनेस प्रतिसाद देऊन आदिमाता महिषासुरमर्दिनी 'शताक्षी' अवतार धारण करून प्रकटली होती. त्या काळात शताक्षीनेच अगस्त्य ऋषिंना दिलेला प्रसाद म्हणजे "शताक्षीप्रसादम्". ह्याच्या नित्य सेवनाने मनुष्याचा बिघडलेला निसर्ग दुरुस्त होत राहतो- शरीराचा, प्राणांचा व मनुष्यबुद्धीचा आणि सत्वगुणाची वृद्धी होऊ लागते.

८. मैदानी खेळ:-
               मुलं हल्ली खेळत नाहीत. हल्ली एका घरात एकच मुलं असत. संपूर्ण बिल्डिंग मध्ये दोनच मुलं. खेळणार कोणासोबत..? ट्युशनलाही जायचं असत. संपूर्ण दिवस अभ्यास करणे हा मुलांवर अत्याचार आहे. अभ्यास योग्य प्रमाणात व खेळणं पण योग्य प्रमाणात पाहिजे. खेळाने तुम्हाला जो पोसिटीव्हनेस येतो, तो खिलाडूवृत्ती, कॉन्फिडन्स येतो आणि एक वेगळीच काम करण्याची धमक येते. स्त्री-पुरुषांनी सुद्धा खेळावे. चाळिशीतही खेळावे, पन्नाशीतही खेळावे, साठीतही खेळावे, खेळत राहिलात पन्नाशीला तर साठीलाही बघाल. आम्हांला फक्त क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी इतकेच मैदानी खेळ माहीत आहेत पण इतरही अनेक मैदानी खेळ आहेत जे पन्नाशी, साठीची माणसेही व्यवस्थित खेळू शकतील. मैदानी खेळांमुळे प्रसंगावधानता तर वाढतेच पण रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. शरीराची हालचाल होते आणि व्यायामही होतो. सध्या कोरोनामुळे संचारबंदी आहे त्यामुळे कोणी लगेच खेळण्यासाठी बाहेर पडू नका. परिस्थिती नॉर्मल झाल्यावर मात्र आठवड्यात एक दिवस तरी जितके जण जमतील त्यांनी वेगवेगळे खेळ खेळायला हवेत.








९. अध्यात्मिक उपासना:-
               दररोज कमीत कमी एकदा आन्हिक करणे, गुरुक्षेत्रम् मंत्राचा जमेल तेवढा जास्तीत जास्त जप रोज करणे. श्रीमदपुरुषार्थ ग्रंथराजचर कमीत कमी एक पान तरी रोज वाचणे. दररोज रात्री सवय लावायची- लहान मुलांबरोबर मोठ्यांनीही ३ वेळा हनुमानचालीसा म्हणावी. एवढं जरी केलंत ना, तरी खूप चांगलं आहे. जे तुम्हांला म्हणता येईल ते जरूर म्हणा. पण ह्या 'बेसिक' गोष्टी मात्र कधीही सोडू नका.
               डॉ. जोशी नेहमी सांगतात, दिवसाच्या २४ तासांमधील कमीत कमी २४ मिनिटे तरी आम्हांला उपासनेसाठी राखून ठेवता आली पाहिजेत. येणारा काळ खडतर आहे. आमच्या प्रत्येक प्रयत्नांना उपासनेची जोड असेल तर अनेक गोष्ट सहज सोप्या होतात. डॉ. जोशींनी सांघिक उपासनेचे महत्वही वारंवार अधोरेखित केलेलं आहे. सध्याच्या काळात जरी सांघिक उपासना शक्य नसली तरीही प्रत्येकजण परिस्थिती नॉर्मल होइल तेव्हा एकत्र येऊन उपासना करूच शकतो. आजच्याही परिस्थितीत टेक्नॉलॉजीचा वापर करून घरबसल्या सांघिक उपासना करता येते. त्याच उत्तम उदाहरण म्हणजे समीर दत्तोपाध्ये ह्यांच फेसबुक पेज आणि अनिरुद्ध टीव्ही. ह्या दोन्ही माध्यमांतून रोज सायंकाळी 8 वाजता उपासना प्रसारित होते. ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्कीच सहभागी व्हावे. दोन्हीचे लिंक लेखाच्या शेवटी देत आहे.


               २०१० सालच्या रामराज्य २०२५ ह्या प्रवचनाव्यतिरक्त डॉ. अनिरुद्ध जोशींनी २०१४ साली "आपले आरोग्य" ह्या विषयावर अगदी सविस्तर व्याख्यान दिले होते. त्यात त्यांनी आरोग्याचे आणि आहाराचे अनेक पैलू उलगडू सांगितले होते. त्याची संपूर्ण माहिती Healthonics ह्या स्वतंत्र वेबसाईटवर आहेत. त्या वेबसाईटची लिंक, ज्यांना रामराज्य २०२५ ही संकल्पना समजून घ्यायची आहे त्यांच्यासाठी आंजनेय पब्लिकेशनची लिंक लेखाच्या शेवटी दिलेली आहे. पण मित्रांनो जाता जाता इतकंच सांगेल. कोरोनाचं संकट फार मोठं आहे. आजच पंतप्रधान मोदींनी २१ दिवसांच्या संपुर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे आणि उद्या हिंदू नववर्षाची सुरवात आहे, गुढीपाडवा आहे. त्यानिमित्त आपण सर्व एक संकल्प करूयात. केंद्र सरकार आणि राज्य सरकार जे सांगेल ते आढेवेढे न घेता ऐकणे हेच सोयीस्कर आहे. पण जोपर्यंत घरात आहोत तोपर्यंत आरोग्याची काळजी घेऊया. जलउपचार पद्धती, कढीपत्ता खाऊ, अध्यात्मिक उपासना करू जे जमेल ते स्तोत्र म्हणू. काळ कठीण आहे. पण डॉ. जोशी म्हणतात त्याप्रमाणे काळजी करू नका, काळजी घ्या. काळजी करायला "तो एकटा" समर्थ आहे.

सौजन्य:
डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी (MD. Medicine)
रामराज्य २०२५

लिंक:
आरोग्यम सुखसंपदा भाग - १
रामराज्य २०२५ (मराठी)
रामराज्य २०२५ (हिंदी)
RamRajya 2025 (English)
Healthonics
Samirsinh Dhattopadhye FB page
Aniruddha.tv

Sunday, 22 March 2020

बरं झालं देवांनी मैदान सोडले...


               एका प्रतिष्ठित वृत्तपत्राचे प्रतिष्ठित संपादक अग्रलेखात लिहितात "देवांनी मैदान सोडले" जगभरात "कोविद-१९" ह्या आजाराने त्यावरून हे महाशय वाट्टेल ते लिहित आहेत. अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. काय तर म्हणे "भक्तांचा ओघ आहे म्हणून मंदिरातील दगडी मूर्तींना देवत्व प्राप्त होते. भक्तांचा ओघच थांबला तर कसला देव आणि देवत्व.? एक विषाणू देवांवर भारी पडला" वगैरे वगैरे... जास्त ओढावेढे न घेता ह्या महाशयांना विचारू इच्छितो.. जर भक्तांमुळे देवाला देवत्व प्राप्त होत असेल तर मग तुम्ही अयोध्येला का गेला होता...??? प्रभू रामचंद्रांनी स्वप्नात येऊन तुम्हांला विनवणी केली होती का मला देवत्व द्यायला या...??? स्वतःच्या सोयीसाठी देवांना आणि देवस्थानांना वापरता नंतर त्यांच्याच अस्तित्वावर आणि प्रभावावर प्रश्न उपस्थित करता...?
               शिवशंभुंच्या मोठ्या मोठ्या बाता मारता आणि त्याच शिवशंभुंची शिकवण सोयीस्करपणे विसरता. जिजाऊ आईसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ह्यांची श्रद्धा आणि विश्वास मोठ्यातला मोठ्या संकटात ढळली नाही. तो अफजलखान महाराष्ट्रावर चालून आला होता तेव्हा त्याचीही मानसिकता अशीच होती. बघूया तुमचे देव तुम्हांला वाचवतात का.? तुमचे देव पळाले.? आज तीच मानसिकता तुमच्यात दिसते.
               देवस्थानांना आर्थिक महत्व कोणामुळे आलं...?? माणसांमुळे चा... देवाला वाहिलेल्या दक्षिणेतील एक रुपया तरी देव घेतो का...??? आज जर देवस्थान बंद असतील तर त्यांचं आर्थिक महत्व कमी होईल पण त्याचं अध्यात्मिक महत्व नाही. ह्या देवस्थानांना आर्थिक महत्व प्राप्त होण्याआधी ह्या देवस्थानांना अध्यात्मिक महत्व होतंच की... एकही भक्त गेला नाही तरी त्या देवस्थानांच अध्यात्मिक महत्व कमी होणार नाही... माणसाचं, समाजाचं कर्मस्वातंत्र्य त्या माणसाचं आणि समाजाचं जीवन ठरवत... निसर्गाचा ऱ्हास केला तेव्हा देवाला विचारून केला का..??? प्रयोगशाळेत विषाणू बनवले ते देवाला विचारून बनवले का...??? इतकी युद्ध झाली, त्यात कोट्यवधी माणसं मेली, ती युद्ध देवाला विचारून केली का...???
               देवाला दोष देण्याआधी मानवाने आधी स्वतःच कर्म तपासावे. जे काही चांगलं झालं ते आमच्यामुळे झालं... वाईट झालं तर ते देवामुळे... माझं वाईट होत असताना देव काय करत होता...?? हा मानवी स्वभावगुणच आहे. आज जी परिस्थिती ओढवली आहे ती मानवाने स्वतःच स्वतः वर ओढवून घेतली आहे. आमच्या कर्मस्वातंत्र्यात आणि त्याच्या कर्मफलात तो देव कधीही हस्तक्षेप करत नाही. जे पेराल तेच उगवेल. आणि बरं झालं देवाने मैदान सोडले... मानवजातीला स्वतःची लायकी समजली आणि स्वतःच्या फायद्यासाठी देवस्थानांचा वापर करणाऱ्यांचे खरे चेहरे जगासमोर आले...

© सुमित शिर्के.

Wednesday, 18 March 2020

आरोग्यम् सुखसंपदा भाग - १

               जगभर कोरोना कोविद-१९ ह्या आजाराने थैमान घातले आहे. चीनमधून हा रोग आता जगभर पसरला आहे. भारतातही ह्या रोगाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारे त्यांच्या परीने सर्व प्रयत्न आणि उपाययोजना कर आहेत तसेच जनतेलाही आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. मास्क, सॅनिटायझर, हँडवॉश अशी सगळी काळजी लोकांकडून घेतली जात आहे. पण हे सर्व झाले बाह्य उपचार... मास्कही कितीवेळ वापरणार. अर्थात मास्क वापरायचे आहेच पण एका ठराविक काळानंतर मास्कची ही व्यवस्थित विल्हेवाट लावावी लागेल. वेळोवेळी बदलावे लागेल. पण जर ह्या सर्व बाह्य उपचारांसोबत जर रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहिली तर कोणत्याही रोगाचा सहज प्रतिकार करता येऊ शकतो.
               आज जेव्हा ह्या विषयावर विचार करत होतो तेव्हा दहा वर्षे मागे गेलो. ६ मे २०१० रोजी डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी  अर्थात प.पु. सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू ह्यांनी "रामराज्य २०२५" ह्या विषयावर प्रवचन केले होते. त्यात त्यांनी वैयक्तिक आरोग्य चांगले राखण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर काय प्रयत्न करायचे तेही सांगितले होते. पण आधी रामराज्य २०२५ ही संकल्पना समजून घेऊयात...


               बापूंच्याच शब्दात सांगायचे झाले तर "२०२५ रोजी रामराज्य आणणे, हे माझे स्वप्न आहे, ध्येय आहे आणि ब्रीदही आहे..." पुढे बापू सांगतात, "पहिल्यांदा आम्हांला बघायचंय- रामराज्य म्हणजे नक्की काय..? 'राम कुठून तरी अवकाशातून खाली उरणार, २०२५ च्या त्रिपुरारी पौर्णिमेला तो राजसिंहासनावर बसणार? आम्ही चवऱ्या ढाळणार, फुलं उधळणार आणि मग आकाशातून देव पुष्पवृष्टी करणार?' असं काही होणार आहे का..? असा फालतुपणा मुळीच नाही. असा विचार माझ्या मनात दुरान्वयेही नाही. अशी स्वप्नही बघू नका... रामराज्य म्हणजे जसं राज्य रामाने अयोध्येत चालवलं, तसं राज्य. अयोध्येतील नागरिक जसे होते, तसे सर्वांनी बनणे, तशी समाजव्यवस्था तयार होणे, प्रत्येक व्यक्ती तशी तयार होणे, तसा समष्टीचा प्रतिसाद येणे म्हणजे रामराज्य आणि ते येणारच... १०८% रामराज्य म्हणजे नक्की काय? प्रजा सुखी आहे प्रजा दुःखी नाही. प्रजा दुर्बल नाही, प्रजा दरिद्री नाही, प्रजा भुकेलेली नाही, प्रजा कोणाच्या शिव्या किंवा लाथा खात नाही असं राज्य म्हणजे रामराज्य..."
               पुढच्या गोष्टी समजून घेण्यासाठी रामराज्य २०२५ ही संकल्पना समजून घेणे गरजेचे होते. रामराज्य २०२५ ह्या संकल्पाचे पाच स्तर आहेत त्यातील पहिला स्तर हा वैयक्तिक स्तर आहे. भारत सुदृढ व्हायचा असेल तर आधी प्रत्येक नागरिकाने सुदृढ व्हायला हवे. त्यासाठी प्रत्येकाने आरोग्यविषयक काय काळजी घ्यायला हवी ह्याचं सविस्तर विवरण डॉ. जोशींनी ह्या पहिल्या वैयक्तिक स्तरामध्ये केलं आहे. त्याच गोष्टी आजच्या काळात गरजेच्या आहेत. आपलं आरोग्य सुदृढ असेल तर मोठ्यातला मोठ्या आजाराला हरवता येतं. त्यातील काही महत्वाच्या गोष्टी इथे सांगतो.

१. जलउपचार पद्धती:-
               रोज सकाळी दात घासल्यानंतर मिठाच्या पाण्याने गुळण्या करून नंतर जलप्राशन करणे. सुरवातीला पन्नास  एम.एल. पाण्याने सुरुवात करायची नंतर हळूहळू आपल्या क्षमतेनुसार हे प्रमाण एक लीटर पर्यंत वाढवत न्यायचं. मुख्य म्हणजे पाणी प्यायल्यानंतर अर्धा तासापर्यंत काही खाऊ नये. ह्यालाच जलउपचार पद्धती (वॉटर थेरपी) म्हणतात. अनेक शारीरिक व मानसिक आजारांना रोखण्याचा हा श्रेष्ठ उपाय आहे. ह्यामुळे जवळजवळ अनेक प्रकारचे विकार आणि आजार आधीच थांबविले जातात. रात्रभर झोपलेले असताना तोंड मिटलेले असते. त्यामुळे तोंडात अनेक अन-एरोबिक बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात वाढतात. ज्यांच्यामुळे अनेक विषारी मलद्रव्ये शरीरात जातात जी अनेक रोग उत्पन्न करण्यास कारणीभूत ठरतात. मिठाच्या पाण्याने चूळ भरल्याने आणि गुळण्या केल्याने घसा, गाल आणि हिरड्यांमधील असे घातक बॅक्टेरिया मरतात, कमीतकमी हतप्रभ तर नक्कीच होतात. रात्रभर शरीरात ज्या प्रक्रिया चालतात त्या दिवसांच्या प्रक्रियांपेक्षा वेगळ्या असतात. रात्रीच्या प्रक्रियांमुळे शरीरात जे विषारी पदार्थ (टॉक्सिन्स) तयार होतात, त्यांना धुण्याचे काम फक्त पाणीच करू शकते. आणि ती टॉक्सिन्स जर शरीराबाहेर उत्सर्जित केली गेली नाहीत तर ह्यातून नानाविध आजार उत्पन्न होतात. आणि म्हणूनच शरीराला जशी बाहेरून अंघोळ घालणे महत्त्वाचे आहे, तशी आतून देखील आंघोळ घालणे महत्वाचे आहे आणि ती फक्त ह्या जलउपचार पद्धतीनेच होते.

२. मुबलक प्रमाणात पाणी पिणे:-
               या पृथ्वीवर सत्तर टक्के पाणी आहे, त्याचप्रमाणे आमच्या शरीरामध्ये सुद्धा सत्तर टक्के पाणी आहे. शरीरातील अनेक प्रक्रियांसाठी पाणी आवश्यक आहे. जर आपण नीट पाणी नाही प्यायलो तर काय होणार.? शरीरातील जुनं पाणी तसंच राहिलं आणि पाणी एकाच जागी साचून राहिलं तर ते खराब होतं. तसेच शरीरातील पेशींमधील व अवयवांमधील पाणी खराब होतं आणि इंद्रियांचं काम बिघडते. म्हणून दिवसातून कमीत कमी तीन लिटर आणि जास्तीत जास्त चार लिटर (याहून जास्त नाही.) पाणी प्रत्येकाने प्यायलाच पाहिजे.

३. सूर्यप्रकाश:-
               दिवसाला कमीत कमी अर्धा तास किंवा दररोज शक्य नसेल तर आठवड्याला एकूण चार ते साडेचार तास सूर्यप्रकाश कसा मिळवता येईल ह्याची काळजी घ्यायला हवी. सूर्योदयापासून दुपारी १ पर्यंत किंवा दुपारी ३ पासून सूर्यास्ताच्या अर्धा तास आधीपर्यंत योग्य वेळ आहे. अशावेळी गॉगल किंवा टोपी वापरायला काही हरकत नाही. पण रेनकोट किंवा डोक्यावर छत्री घेऊन फिरू नका. त्याने सूर्यप्रकाश मिळणार नाही. फक्त सुर्यप्रकाशापासूनच आम्हाला व्हिटॅमिन डी मिळते. जे शरीरातील कमीत कमी ३६० वेगवेगळ्या प्रक्रियांसाठी आवश्यक असते. सूर्यप्रकाश हाच एनर्जीचा ओरिजिनल सोर्स आहे. त्यामुळे मानवाच्या शरीरामधील सुद्धा अनके एंझाइम्स आणि बायोकेमिकल प्रॉडक्ट्स ह्यांच्या क्रिया सुर्यप्रकाशावर अवलंबून आहेत. शरीरातील अनेक क्रिया सुरळीत चालणे वा न चालणे हे सूर्यप्रकाशाच्या प्राप्तीवर अवलंबू असतात आणि म्हणूनच सूर्यप्रकाश कमी मिळणे हे स्थौल्याचे एक कारण आहे. नुसतं सूर्यप्रकाशात उभे राहणे आणि चालणे ह्यांच्यामध्ये फरक आहे. चालण्याने सूर्यप्रकाशापासून अधिक फायदा मिळतो. केवळ उभे राहण्याने त्याच्या पन्नास टक्केच फायदा मिळतो.

४. फळं खाणे:-
               फळं खाणं म्हणजे फक्त आंबा, फणस आणि केळी खाणे नव्हे. त्याच्यापुढे आम्हाला काही दिसतंच नाही. फळ हेच मानवाचं मुख्य अन्न आहे, हे लक्षात ठेवा. मानवाची सर्व डायजेस्टिव्ह एनझाइम्स की फळं पचवणारी एनझाइम्स आहेत. फळ ओज वाढवणारे आहे. फळं खाण्याने स्त्री-पुरुष दोघांसाठी आवश्यक असणारे बदल त्यांच्यात उचितपणे होतात. सकाळी नाश्त्याच्या वेळी, रात्री जेवणानंतर नानाविध फळं खावीत. जी सालीसकट खाण्याची फळे आहेत ती सालीसकट खावीत. फळांच्या सालीमध्ये जास्तीत जास्त व्हिटॅमिन्स, सेलेलिअम, कोबाल्ट ही द्रव्य असतात. जी आम्हांला इतर पदार्थांतून मिळत नाहीत. फळं परवडत नाहीत असे काही जण म्हणतात पण जी फळं महाग नाहीत ती खा. ऋतूनुसार मिळणाऱ्या बोरं, करवंद, आवळा, चिंच, जांभूळ ह्या सर्व फळांमध्येही मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन्स असतात. पण ती खायच्या आड आमचं स्टेटस येत. जास्त पिकलेलं केळं आम्ही टाकून देतो, पण त्यामध्येच मुबलक प्रमाणात चांगले बॅक्टेरिया असतात ज्याची आपल्या शरीराला गरज असते. अनेक चांगले व्हिटॅमिन्स, ट्रेस एलिमेंट, सेलेनियम, क्रोमिअम वगैरे जी शरीरात नॅनोग्राम्समध्ये आवश्यक आहेत ती फळांमधून आणि भाज्यांमधून मिळतात. उदा. "क" जीवनसत्त्व.

५. थोडं मांसाहाराबद्दल:-
               जवळा आणि बांगडा... जवळ्यामध्ये आणि बांगड्यामध्ये मॅक्सिमम चांगल्या गोष्टी आहेत. फिशमधील मोदके हा प्रकार खूपच कमी लोकांना माहीत आहे. माशांमध्ये ओमेगा ३ आणि ओमेगा ६ असतात ज्यांच्यामुळे माणसाच्या शरीरात खूप मोठे आणि चांगले बदल घडून येतात. ते कुठल्याही शाकाहारी अन्नामध्ये नसतात. शाकाहारी लोकांनी मांसाहारी बना, असा ह्याचा अर्थ मुळीच नाही. ह्यालाही एक मार्ग आहे. ज्यांना मांसाहार करता येणार नाही त्यांनी तिळाचे तेल वापरावे. "एच.डी.एल कोलेस्ट्रॉल" (चांगले कोलेस्ट्रॉल) हे काही मोजक्या फळांमध्ये, त्यांच्या सालींमध्ये, तीळामध्ये आणि तिळाच्या तेलामध्ये असते. हे वाईट कोलेस्ट्रॉलचा नाश करते म्हणजे हार्ट अटॅक पासून आमची सुटका करते. "एचडीएल" आणि ओमेगा ३ हे तिळाच्या तेलात आहे, फ्लेक्स सीड ऑईलमध्ये आहे, सगळ्या माशांमध्ये आहे. पण जेव्हा मासा आम्ही डीप फ्राय करतो आणि भरपूर मसाला लावून खातो, तेव्हा ओमेगा ३ आणि एचडीएल नष्ट होतात. त्यामुळे कमीत कमी तेलात तळावे किंवा फिशकरी खावी. तेलाशिवाय सुद्धा फिश चांगले उकडण्याचे अनेक प्रकार आहेत.

               अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत पण एकाच लेखात त्या सांगायचा प्रयत्न केला तर लेख खूपच लांबलचक होईल. त्यामुळे ह्या विषयाचे दोन भाग केले आहेत. पुढील भागाची सुरुवात सगळ्यांना नावडत्या पण आवश्यक असणाऱ्या गोष्टीपासून करणार आहोत. तो गोष्ट म्हणजे कढीपत्ता. हा कढीपत्ता एका मोठ्या दुर्धर आजारावर गुणकारी औषध आहे. त्याबद्दल पाहुयात पुढील लेखात...


सौजन्य:
डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी, Md. Medicine
(रामराज्य २०२५)

डुम्स डे किंवा अंतिम निर्णयाचा दिवस

Repost Original Date: 02 मार्च 2021            ख्रिश्चन, ज्यू आणि इस्लाम हे तिन्ही अब्राम्हीक धर्म मानले जातात आणि ह्या तिन्ही धर्मांच्या उग...