My Mentor

                                   माझे सदगुरू
                         पिता, मित्र आणि मार्गदर्शक
  

               
                 प्रत्येकाच्या आयुष्यात काही सुंदर क्षण घडलेले असतात, घडत असतात. माझ्याही आयुष्यात असेच अनेक सुंदर क्षण घडले आणि अजुनही घडत आहेत. आजही मला ती तारिख आठवते, १५/८/२००२ ज्या दिवशी मी बापुंना-DADला पहिल्यांदा पाहिले. तेव्हा वयाने लहान होतो, एवढी काही समज नव्हती. तरीही हा माणुस इतरांपेक्षा वेगळा आहे, हे मात्र जाणवलं होतं. त्यानंतर बापुंकडे येत राहीलो ते फक्त त्यांचा आवाज एेकण्यासाठीच... नंतर हळुहळु बापुंबद्दल समजत गेलं. एक डॉक्टर असुनही हा माणुस टेक्नॉलॉजीवर बोलतो, प्राचीन बलविद्या शिकवतो, निष्काम भक्तीसेवा करायला शिकवतो आणि करूनही घेतो.


                              माझ्या बापुंबद्दल...
                       डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी
                     MBBS, MD. MEDICINE
                      आयुर्वेद, Homiopathy.
               प्राचीन भारतीय बल विद्यांमध्ये निष्णात.

             बापुंनी मला काय शिकवलं, एकच Celebrate Life. जीवनातला प्रत्येक क्षण साजरा करायला शिकवलं. तोही कसा तर तुमच्या देवालाही त्यात सामील करून घ्या. प्रेमाने त्याला हाक मारा, सुखातही आणि दुःखातही. सुखात तो तुमच्याबरोबर तो नाचतो आणि दुखःत तुमच्या मनावर हळुवार फुंकरही घालतो. बापुंनी मला अंबज्ञता शिकवली. माझ्या जीवनात उतरवली.
               बापुंच आणि माझ नातं काय? अगदी त्यांच्याच शब्दात सांगायचं झाल तर, "जो मला त्याचा सख्खा बाप मानतो, मी फक्त त्याचाच..." बापुंच-माझं नात 'बाप-लेकाचं'. ह्या एका नात्यातच मित्रत्वही आहे, मार्गदर्शकही आहे. आजपर्यंत DAD ने मला कुठलीही गोष्ट कमी पडू दिली नाही, माझा प्रत्येक हट्ट पुरवला. त्याचबरोबर माझ्यासाठी काय उचित आहे तेच मला दिले.


                 DAD ने मला दिलेली सर्वोच्च भेट कुठली तर "माझी मोठी आई".  आदिमाता महिषासुरमर्दिनी. ती माझ्या DAD ची आई म्हणुन माझी मोठी आई... तिच्या लाभेविण प्रेमाचा अनुभव मी प्रसन्नोत्सव आणि श्रीश्वासम उत्सवात घेतला. ह्या माझ्या आजीने माझे भरपुर लाड पुरविले. तिची आणि माझी भेट माझ्या DAD नेच घडवून आणली... I LOVE U DAD...
                माझ्या DAD ला करायचयं तरी काय? तर आमचं एकच ध्येय. रामराज्य २०२५... म्हणजेच २०२५ पर्यंत रामाच्या अयोध्येत जसा समाज होता, तसा आपला भारतवर्ष घडवायचा, सर्वदृष्ट्या समर्थ. त्यासाठी आपला DAD रात्रंदिवस झटतोच आहे आणि त्यासाठी खारीचा वाटा उचलायला संपुर्ण बापुपरिवार तयारच आहे. आणि त्यासाठीच आमच्या DAD च्या जीवनाचं ब्रीदवाक्य आम्हां वानरसैनिकांच्या जीवनाचं ब्रीदवाक्य बनलयं...






2 comments:

डुम्स डे किंवा अंतिम निर्णयाचा दिवस

Repost Original Date: 02 मार्च 2021            ख्रिश्चन, ज्यू आणि इस्लाम हे तिन्ही अब्राम्हीक धर्म मानले जातात आणि ह्या तिन्ही धर्मांच्या उग...