Monday, 27 January 2020

डार्विनची उत्क्रांतिवादाची "लबाडी"




               आज प्रत्येकजण शाळेपासून एक गोष्ट शिकत आलाय की माकडापासून मानव बनला. माकडसदृश्य प्राणी उत्क्रांत होत होत अवघ्या तीस हजार वर्षांपूर्वी संपूर्ण उत्क्रांत मानव तयार झाला. साधारणतः १८५८ मध्ये डार्विनने हा सिद्धांत मांडला. अनेकांनी तो उचलून धरला अनेकांनी फेटाळून लावला. पण मला नेहमी काही प्रश्न पडायचे. १८५८ च्या आधी कोणता सिद्धांत होता...?? ? जगाचं माहीत नाही पण आमच्या वेद-पुराणांमध्ये अनेक वैज्ञानिक सिद्धांत सांगितलेले आहेत. अगदी बिग बँग थेअरी सुद्धा सांगणारे आमचे वेद-पुराण हे माकडापासून मानव बनला हे का सांगत नाहीत...??? एक ना अनेक प्रश्न त्यांची उत्तरं त्या उत्तरातून आणखी प्रश्न ही साखळी चालूच होती आणि त्यानंतर मी एका निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचलो ते म्हणजे डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत थोतांड आहे...
               हे कसे काय...??? विज्ञान इतकी वर्षे हे सगळं सांगतय ते खोटे कसे काय...?? हे समजून घेण्याआधी काही प्रश्न विचारतो... १. बारा अब्ज वनस्पती प्रजाती आणि तीन-चार अब्ज प्राणी प्रजातींपैकी फक्त माकडाच्या एका प्रजातीतूनच मानव उत्क्रांत का झाला.? २. माकडाची एकच प्रजाती का उत्क्रांत झाली.? ३. जर उत्क्रांतिवादाचा सिद्धांत इतका बरोबर आहे तर मग फक्त माकडच का इतर एकही प्राणी उत्क्रांत का नाही झाला.? ४. बाकीचे प्राणी जाऊद्या पण माकडाची एकच प्रजाती उत्क्रांत का झाली...??? इतर प्रजाती उत्क्रांत का नाही झाल्या.??? ह्या आणि अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं डार्विनची पालखी नाचावणारे देऊ शकत नाहीत...
              सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा डार्विनने उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला त्यावेळी जीन्स(गुणसूत्र) आणि DNA चा शोध लागला नव्हता. पण आजच जेनेटिक सायन्स असं सांगते की कोणत्याही प्राण्याच्या जीन्समध्ये कितीही काळ गेला तरीही नैसर्गिकरित्या बदल होऊ शकत नाही. अर्थात कृत्रिमरीत्या जीन्स बदलता येऊ शकतात. तितकं प्रगत विज्ञान आज उपलब्ध आहे पण अजूनही जगासमोर आणलं गेलं नाही. असो... जीन्समध्ये नैसर्गिकरित्या बदल होऊ शकत नाहीत म्हणजेच माकडाच्या जीन्स मध्ये बदल होऊन मानव बनू शकत नाही. बाह्य परिस्थितीनुसार एकाच प्राण्याच्या अनेक प्रजाती असू शकतात. उदा. माकडाच्या अनेक प्रजाती आहेत औरंग उटाण, गोरिला, चिंपांझी पण जीन्स मात्र माकडाचेच  आहेत. अगदी मानावाच्याही अनेक प्रजाती आहेत. आफ्रिकन, युरोपियन, इंडो-एशियन, मंगोलियन पण जीन्स मात्र मानवाचेच आहेत. जर आधुनिक जेनेटीक सायन्सनुसार जीन्समध्ये नैसर्गिकरित्या बदल होतंच नसतील तर मग डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताला आधार काय उरला...??? ह्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर कोणताही डार्विनसमर्थक शास्त्रज्ञ किंवा इतिहासकार देऊ शकत नाही...
               कोणत्याही लबाडीचे हेतू आणि परिमाण ठरलेले असतात तसेच ह्या डार्विनच्या लबाडीचेही आहेत. आधी परिणाम पाहुयात... डार्विनच्या लबाडीचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे कालगणने मध्ये आमूलाग्र गोंधळ निर्माण झाला. तीस हजार वर्षांपूर्वी प्रगत मानव निर्माण झाला ह्या एका वाक्याने सगळ्या प्राचीन ग्रंथांबद्दल आणि त्यांचा उत्पत्तीच्या काळाबद्दल संभ्रम निर्माण झाला. उदाहरण घ्यायचं झालंच तर भगवान महाविष्णूंच्या दशावताराचं घेऊ. पण हेच दशअवतार कालगणनेत निर्माण झालेला गोंधळही मिटवतात. ह्याबाबतीत दोन थेअरी आहेत पहिली अशी की पाच हजार वर्षांपूर्वी आर्य भारतात आले. ते भारतात येत असताना महाविष्णूचे पहिले तीन अवतार भारताबाहेर झाले आणि बाकीचे सहा अवतार भारतात आल्यावर झाले. वाक्य लक्षात ठेवा गेल्या पाच  हजार वर्षांत सहा अवतार झाले, असे एक थेअरी सांगते. मग माझा प्रश्न असा की जर पाच वर्षांत सहा अवतार झाले तर एव्हरेज पकडला तर प्रत्येक हजार वर्षांमध्ये एक अवतार... आणि त्या गोळाबेरजेनुसार आता नववा  अवतार मानले जाणारे गौतम बुद्ध ह्यांचा काळ सुरू असायला हवा... गेल्या हजार वर्षांपूर्वी श्रीकृष्ण अवतार आणि दोन हजार वर्षांपूर्वी राम अवतार असायला हवा. पण ह्यातील काही तरी तुम्हांला गेल्या हजार, दोन हजार वर्षांमध्ये दिसतं का...??? गोंधळात ना..??? खरी गंमत तर अजून पुढे आहे...


                 दुसरी थेअरी सांगते की श्रीकृष्ण अवतार इ.पु. ३०००  वर्षांपूर्वी म्हणजे आजपासून ५००० वर्षांपूर्वी तर राम अवतार इ.पु. ५५०० वर्षांपूर्वी म्हणजेच आजपासून साधारणतः ७५०० वर्षांपूर्वी झाला. पहिली थेअरी सांगते की ५००० वर्षांपूर्वी आर्य भारतात आले त्यानंतर महाविष्णूचे चारपासून पुढचे अवतार झाले. दुसरी थेअरी सांगते की ५००० वर्षांपूर्वी श्रीकृष्ण अवतार आणि ७५०० वर्षांपूर्वी राम अवतार झाला...??? आता मोठा प्रश्न हा आहे की कोणती थेअरी खरी..??? आर्य नक्की कधी भारतात आले..??? आणि राम-श्रीकृष्ण अवतार कधी झाले..??? पाहिलंत ना किती मोठा गोंधळ निर्माण करून ठेवलाय डार्विनच्या सिद्धांताने...
         आता परिणाम तर पाहिला आता हेतुकडे वळूयात... डार्विनने उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला १८५८ मध्ये. आणि हा कालखंडच फार महत्वाचा आहे. साधारणतः १७६४ पासून युरोपमध्ये एक गुप्त संघटना आकार घेत होती. जिचे उद्देश, हेतू फारच गुप्त ठेवले जात होते. ह्या गुप्त संघटनेचे नाव आहे इल्युमिनाटी आणि हिचा मुळ हेतू आहे जगावर राज्य करणे. (ही कोणतीही परिकल्पना किंवा हॉलिवूडच्या सिनेमाची पटकथा नाही.) ह्या संघटनेने तिच्या हेतूंना आकार देण्यासाठी सैतानी मार्गाची निवड केली आणि ह्या लोकांनी वसुंधरेच्या "लाखो वर्षांच्या इतिहासात" वेळोवेळी सपाटून मार खाल्लाय... मधल्या काळात मानव विज्ञानापासून दूर गेला होता. त्यामुळे ह्या संघटनेने अनेक वैज्ञानिकांना हाताशी धरून एक एक वैज्ञानिक प्रयोग जगासमोर आणायला सुरुवात केली. लोकांना विज्ञानाची इतकी भुरळ पडली की समोर येईल ती गोष्ट खरी मानायला सुरुवात केली. हेच ह्या संघटनेला हवे होते. ह्यामुळे झाले काय तर लोकांचा प्राचीन धार्मिक ग्रंथांवरील विश्वास उडाला. मग डार्विनचा सिद्धांत समोर आणला गेला. डार्विनच्या सिद्धांताचे दोन मूळ हेतु होते १. कालगणनेत गोंधळ निर्माण करणे. २. मानवजातीचा खरा इतिहास पुढे येणाऱ्या पिढ्यांना कळू न देणे. ज्या खऱ्या इतिहासामध्ये ह्या लोकांनी सपाटून मार खाल्ला आहे. तो लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून ही डार्विनची ही लबाडी रचली गेली. त्या खऱ्या इतिहासाचे अनेक संदर्भ बायबल मध्ये, भारतीय प्राचीन ग्रंथांमध्ये, ग्रीक आणि इजिप्त संस्कृती मध्ये आढळतात पण कालगणानेमध्येच गोंधळ निर्माण झाल्यामुळे आताच्या पिढ्यांना ह्या गोष्टी खोट्या वाटतात...
         भारतामध्येही कोणी लबाड माणूस किंवा संघटना विज्ञानाचा दखला देऊन भारतीय प्राचीन ग्रंथांना रद्दी ठरवण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी डार्विन सारख्याच लबाडांचा आधार घेतात. मानव जातीचा खरा इतिहास जो बायबल, ज्यू धर्माचे प्राचीन ग्रंथ आणि भारतीय प्राचीन ग्रंथांमध्ये आहे तो जर समोर आला तर अध्यात्माचे महत्व अधोरेखित होईल. आणि ह्या संघटनेला जगावर राज्य करण्याचं जे त्यांचं स्वप्न खरं करायचं असेन तर अध्यात्माचे खच्चीकरण गरजेच आहे... त्यामुळे प्राचीन नोंदीबद्दल जमेल तितका संभ्रम निर्माण करण्यासाठीच डार्विनचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत अर्थात लबाडी रचली गेली. अशा प्रकारची लबाडी भारतात अगदी सत्ययुगापासून कधीच चालली नाही आणि ह्यापुढेही चालणार नाही. विज्ञान कितीही प्रगत झालं तरीही त्याला मर्यादा आहेत. आजच्या प्रगत जेनेटिक सायन्सनेच डार्विनची सगळी लबाडी उघड केली. अशा नाठाळ लोकांसाठी देऊळ बंद चित्रपटातील एक डायलॉग लिहून थांबतो. विज्ञान म्हणजे रेषाखंड.. 0 कडून 1 पर्यंत येऊन थांबणारे... 0101 बायनरी आणि अध्यात्म म्हणजे रेषा अनंताकडून अनंताकडे... आणि हा आमचा समृद्ध वारसा आहे त्यामुळे अश्या लबाड्या आम्हा भारतीयांपुढे चालणार नाहीत.

©सुमित शिर्के, खारघर

Saturday, 25 January 2020

राजकारणावर बोलू काही...


         "किती रे राजकारणावर बोलतोस..?",  "सोशल मिडियावर राजकारणाबद्दल काही लिहीत जाऊ नकोस...", "राजकारणावर बोलून, लिहून तुला काय मिळणार आहे का मोदी तुला काही देणार आहे...???", आणि मग येतो शेवटचा प्रश्न "अरे असं काही लिहीत जाऊ नकोस, मार खायचाय का तुला..???" असे अनेक प्रश्न मला विचारले जातात घरच्यांकडून आणि मित्र मंडळींकडून... अर्थात त्यात सूर हा काळजीचाच असतो. काही चुकीचं घडू नये हाच हेतु ह्या प्रश्नांमागे, समज किंवा दम म्हणा ह्या मागे नेहमी चांगलाच हेतु असतो. पण मग मला एक प्रश्न पडतो की मग समोर एखादी चुकीची घटना घडत असेल तर त्यावर बोलायचंच नाही का...??? अर्थात त्या माझ्या मते जी घटना चुकीची आहे त्याचे अनेक पैलू असू शकतात आणि तीच घटना दुसऱ्यासाठी योग्य असू शकते. पण म्हणून त्याबद्दल बोलायचेच नाही का...??? राजकारण असो की इतर कोणतीही गोष्ट...
         सुरवातच करायची झाली तर २०१४ मध्ये मोदी विरोधक ह्या कॅटेगरीमध्ये मी मोडत होतो. अर्थात काँग्रेसचा समर्थकही नव्हतो. काय राजकारणावर बोलून मिळणार आहे.. सगळे साले सारखेच ह्याचं विचारांचा... त्यामुळे कोण मोदी आला काय आणि गेला काय परिस्थिती जैसे थे च राहणार हा विचार अगदी मनात घट्ट होता... पण एक एक गोष्ट पुढे घडत गेली, वर्ष सरली आणि मोदी विरोधक ह्या कॅटेगरी मधून "मोदी भक्त" ह्या कॅटेगरी मध्ये अगदी सहज आलो आणि "नरेंद्र मोदी" नावाच्या व्यक्तीची एक वेगळी ओळख पटली... जी ओळख अजून बहुतांश लोकांना समजलीच नाहीये, कारण हा माणूस शब्दांपेक्षा कृतीतून जास्त व्यक्त होतो. आणि आम्ही फक्त त्याच्या शब्दांकडे लक्ष देतो. आता बस झालं मोदी पुराण आता मूळ मुद्द्याकडे वळूयात....
         ह्या मोदी नावाच्या माणसाला विरोध करण्यासाठी विरोधक अनेक डावपेच टाकत होते आणि अजूनही कटकारस्थानं सुरू आहेत... त्याबद्दल बोलणं म्हणजे संकटाला आमंत्रण देणं असंच आप्तांना वाटतं आणि त्यात काहीच वावगं नाही कारण त्यांना काळजी वाटते. तेही त्यांच्या जागेवर बरोबरच आहेत. पण चुकीच्या गोष्टी घडत असताना काही बोलायचंच नाही का...??? जर कोणाचं उत्तर असेल नाही तर I am Sorry... कोणी जर भारत तेरे टुकडे होंगे, हर घर से अफझल निकलेगा सारखे नारे देत असेल तर मी गप्प राहायचं...??? कोणी माझ्या दैवतांना उलटसुलट बोलत असेल तर मी गप्प राहायचं...??? का...??? आजही तो दिवस आठवतो जेव्हा JNU मध्ये दुर्गा मातेची तुलना वेश्येशी केली होती... का गप्प राहायचं...??? तुम्हांला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ह्याचा अर्थ असा नाही की आमच्या भावनांना ठेच पोहोचवाल. ह्या सगळ्या प्रकारानंतर "कोणीतरी" माझे कान उपटले होते... कोणी तरी षंढ येतात आमच्या आदीमतेचा इतका मोठा अपमान करतात तुमच्या तळपायाची आग मस्तकात का गेली नाही...??? थोडी ना तुम्हांला कुठे मोर्चा घेऊन जायला सांगितलंय, फेसबुक ट्विटर सारखी प्रभावी माध्यम आमच्याकडे असताना निषेधाचा एक शब्दही कोणी लिहू नये... त्यादिवशी त्या दुर्गामाते समोर उभे राहून कान पकडून माफी मागितली... तेच JNU चे षंढ आजही धुमाकूळ घालत आहेत तरीही आम्ही गप्पच बसायचं का...???
         जिथे जिथे आम्ही चुकीला चूक म्हणत नाही तिथे तिथे आमचं नुकसान आहे. आणखीन एक समज राजकारणावर बोलून काही मिळणार आहे का...??? माझा उलट प्रश्न आहे काही मिळणारच नसेल तर देशाच्या सरकारकडून तरी कशाला अपेक्षा ठेवता...??? निवडणूकीत सहभागी होऊन सरकार का ठरवता...??? किंवा राजकारणावर बोलून काही मिळायलाच हवं का...??? गेल्या सत्तर वर्षांमध्ये देशाचं खरं नुकसान जर कोणी केलं असेल ना तर ह्याच राजकीय उदासिनतेने... बोलून काय मिळणार आहे... तुम्ही कोणत्याही पक्षाचे समर्थक असा पण जर तोच पक्ष चुकीचं पाऊल टाकत असेल तर त्या पक्षाला जाब विचारता आला पाहिजे. हीच खरी राजकीय जागरूकता आहे. जी येणाऱ्या काळात गरजेची आहे. आजघडीला कोणताही राजकीय पक्ष धुतल्या तांदळासारखा स्वच्छ नाही. पण त्यातल्या त्यात better option निवडता यायला हवा.
         एका मोदी नावाच्या माणसाचा विरोध करण्यासाठी काही लोकं गुपचूप चिनी राजदूतांची भेट घेतात, देशाबाहेर पाकिस्तानी लष्करी आणि ISI च्या अधिकाऱ्यांशी गुप्त चर्चा करतात. ह्याचेच चेले पाकिस्तान जाऊन मोदीला हरवायला  उघड उघड मदत मागतात. पण आम्ही काय करायचं गप्प बसायचं... JNU मध्ये माझ्या देशाचे तुडके करण्याच्या घोषणा देणाऱ्याला बोलावून एक स्वघोषित हिंदुत्ववादी पक्ष त्याचा शाल नारळ देऊन सत्कार करतो त्यावेळी आम्ही काय करायचं तर गप्प बसायचं... एक ट्विटही कारायचा नाही, एक फेसबुक पोस्टही लिहायची नाही... पुन्हा आणखीन एक प्रश्न (ह्याला मी टोमणा समजतो.) तुझ्या एका पोस्टने, ट्विटने असा खुप मोठा बदल होणार आहे... तर माहितीसाठी सांगतो अरब देशांमध्ये काही वर्षांपूर्वी आंदोलनांची जी लाट आली त्यात अनेक सरकारे उलथवून लावली गेली त्याची सुरवातच मुळी एका ट्विटने झाली होती. अर्थात माझ्या पोस्टने काही मोठा बदल वगैरे होईल असं मला म्हणायचं नाहीये पण आज जर आम्ही काही बोललो नाही, त्या मोदी नावाच्या व्यक्तीच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो नाही तर आज विरोध करणारे हे लोकं उद्या तुमच्याच पुढच्या पिढीला बोलायचं सोडा स्वतंत्र विचारही करू देणार नाही...


         काय रे आजकाल खूप मोदी भक्तीत बुडालेला आहेस...??? प्रश्नाचं उत्तर आहे तो माणूस आहेच तसा... जेष्ठ आणि अनुभवी पत्रकार भाऊ तोरसेकरांनी एका व्याख्यानात एक छोटीशी गोष्ट सांगितली होती ती थोडक्यात सांगतो. एका गावातल्या पाटलाची आई आजारी पडली आता तिला डॉक्टर कडे न्यायचं तर तो नदी पलीकडच्या गावात. त्यात रात्रीचा मिट्ट अंधारही आहे. पाटलाकडे चांगले पहिलवान गडी माणसं होती. त्यातील तिघांना सोबत घेऊन होडीने नदी पार करायचं ठरलं. ठरल्याप्रमाणे आलटून पालटून तिघेही व्हल्ले मारत होते पण समोरचा किनारा काही आला नाही. रात्र सरली  तांबडं फुटलं तेव्हा लक्षात आलं की आपण अजून ह्याच किनाऱ्यावर आहोत. कारण होडीचा दोर मागच्या झाडाला बांधला होता... गेली सत्तर वर्ष हा दोर सोडला नव्हता हे दोर सोडण्याचं काम हा मोदी नावाचा माणूस करतोय... मी तर म्हणेन त्याही पलीकडे जाऊन आणखीन एक मोठं काम मोदींनी केलय ते म्हणजे भारतीय समाजातून राजकीय उदासीनता घालवली... २०१४ च्या आधी फेसबुक प्रेमींचा अड्डा होता आज एक एक फेसबुक अकाउंट एक एक पक्ष कार्यालय आहे मग ते कोणत्याही पक्षाचं का असेना. जितका राजकारणाचा अतिरेक वाईट त्यापेक्षाही राजकीय उदासीनता वाईट. आज मोदींवर टीका करायच्या उद्देशाने का होईना लोकं राजकारणावर बोलत आहेत. एक राजकीय मंथन सुरू आहे. ह्या मंथनातून जसे संभ्रम रुपी हलाहल बाहेर काढण्याचा प्रयत्न होतोय तसंच अमृतरुपी सत्यही बाहेर येतच आहे.
         पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ ह्यांचे अनेक व्याख्यानं मी पहिली ऐकली आहेत. त्यातली त्यांनी सांगितलेली एक गोष्ट फार महत्वाची आहे... "बोलने का यही एक आखरी मौका बचा है, जिसे लिखना आता है वो लिखो, जिसे बोलना आता है वो बोलो, जिसे चिल्लाना आता है वो चिल्लाओ... पर जिसे कुछ भी नही आता उसने कम से कम एक काम करना है के जो चिल्ला रहा है उसके पिछे खडे रहो... उसे रोको मत..." तुम्ही भारतीय राजकारणाचा विचार कशाप्रकारे करता हे मला माहीत नाही. पण मी भारतीय राजकारणाचा विचार करताना तिसरे महायुद्ध हा विषय त्याला जोडून पाहतो. त्यामुळे सध्या देशात जी काही अनागोंदी माजवण्याचा प्रयत्न होतोय त्याचे अनेक गंभीर अर्थ समजतात... त्यामुळे माझं तरी मत असं आहे की, नरेंद्र मोदी नावाच्या माणसाच्या मागे ठामपणे उभे राहण्यातच भारताचं भलं आहे...
         जाता जाता... जेष्ठ पत्रकार पुष्पा त्रिलोकेकर ह्यांनी साधारणतः ७-८ वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका लेखातील काही ओळी आजही ठळकपणे आठवतात. पुष्पा त्रिलोकेकर ह्यांनी आचार्य अत्रेंच्या मराठा ह्या दैनिकात पत्रकारितेला सुरुवात केली होती आणि साडेपाच दशके त्यांचा पत्रकारितेचा अनुभव आहे. त्या त्यांच्या लेखात लिहितात. "तिसरे महायुद्ध आज जगाच्या उंबरठ्यावर उभे राहिलेले आहे, असं असताना भारतात घटनाविहीन अराजकं निर्माण झाली (आजची परिस्थिती काही वेगळी नाही.), तर ह्या तिसऱ्या महायुद्धाची रंगभूमी भारतीय उपखंड हीच असेल! कोण कुठे आहे, किती पाण्यात आहे याची विवंचना निव्वळ राजकारण म्हणून करायची नाही - त्या पाण्यात हा देश व देशातील माणसे आकंठ बुडताना आम्ही थंडपणे बघायचे का, हा खरा प्रश्न आहे..."

©सुमित शिर्के, खारघर

डुम्स डे किंवा अंतिम निर्णयाचा दिवस

Repost Original Date: 02 मार्च 2021            ख्रिश्चन, ज्यू आणि इस्लाम हे तिन्ही अब्राम्हीक धर्म मानले जातात आणि ह्या तिन्ही धर्मांच्या उग...