Wednesday, 3 August 2016

नॉस्त्रादेमसची भाकिते : १८५७ चा स्वातंत्र्यलढा

(Source : Internet)

              इ. स. १६०० मध्ये ब्रिटिशांनी भारतात पहिले पाऊल ठेवले. सुरवातीला व्यापाराच्या उद्देशाने आलेल्या ह्या इंग्रजांनी संपुर्ण भारतात आपले पाय रोवले. त्याकाळात भारतात अनेक छोटी छोटी संस्थाने होती. त्याचदरम्यान ब्रिटिश व्यापार्‍यांची 'ईस्ट इंडिया कंपनी' उभी राहिली. अनेक मार्गांनी भारतातील संस्थानिकांना खुष करत ब्रिटिशांनी भारतामध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले. त्या जोरावरच त्यांनी आपल्या व्यापाराच्या आणि मालाच्या संरक्षणासाठी लष्कर बाळगण्याची परवानगी संस्थानिकांकडून मिळवली. हळूहळू ईस्ट इंडिया कंपनी आपले मनसुबे उलगडत गेली. संस्थानिकांमध्ये वाद निर्माण करत दोन्हीं बाजूंना मदत पुरवण्याचे काम ईस्ट इंडिया कंपनी करत गेली. 'फोडा आणि राज्य करा' या नीतीचा अवलंब करत ब्रिटिशांनी भारतात भक्कम पाय रोवले.
                हळूहळू ब्रिटिशांची मुजोरी वाढत गेली. ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हरर्नर लॉर्ड डलहौसीने एक  नियम पारीत केला. ज्या संस्थानिकांना वारस नाही आणि ज्यांनी दत्तक हक्काने वारसदार ठरवला आहे, त्यांचा संस्थानावरचा हक्क नाकारून, ते संस्थान खालसा करून ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात येईल. ह्या सर्व घडामोडींमुळे काही संस्थानिक खवळून उठले. मराठ्यांचे शेवटचे पेशवे नानासाहेब हे दत्तकपुत्र, झाशीची राणी लक्ष्मीबाई ह्यांना संतान नसल्यामुळे त्यांनीही युवराजला दत्तक घेतले होते.  अशा सर्व संस्थानांच्या नेत्यांनी एकत्र येऊन ६ जून १८५७ रोजी एकाच वेळी भारताच्या सर्व भागांत ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारण्याचे ठरविले. तशी सगळीकडे गुप्तपणे तयारीही सुरू झाली.

मंगल पांडे
(Source : Wkipedia, Internet)

               ब्रिटिशांनी भारतीय सैनिकांच्या अनेक बटालियन्सही उभारल्या होत्या. त्या सैनिकांना जी काडतुसे पुरवली जात होती, त्या काडतुसांवरील कातडी आवरण दातांनी कुरतडून काढावे लागे. त्याला गायीची आणि डुकराची चरबी लावलेली असते, अशी बातमी सर्व नेटिव्ह सैनिकांमध्ये पसरली. गायीची चरबी हिंदूंना निषिद्ध तर डुकराची चरबी मुस्लिमांना निषिद्ध. सर्व नेटिव्ह बटालियन्समध्ये संतापाची लाट उसळली. त्यांनी ब्रिटिश अधिकार्‍यांचे आदेश मानण्यास मनाई केली. अशा परिस्थितीत मीरत येथील छावणीतील मंगल पांडे ह्या नेटिव्ह सैनिकाने विद्रोहाचे निशाण उगारले. बाकिच्या भारतीय सैनिकांना जरब बसावी, ह्या उद्देशाने ब्रिटिशांनी सर्वांसमक्ष मंगल पांडेला फाशी दिली. पण त्याचा परिणाम उलटा झाला. संपुर्ण मीरतची छावणी पेटून उठली. १० मे १८५७ रोजी मीरतच्या नेटिव्ह सैनिकांनी ब्रिटिश अधिकार्‍यांना ठार करून शस्त्रागार लुटले आणि दिल्लीकडे कूच केली. ठरलेल्या वेळेच्या महिनाभर आधीच उठावाला सुरवात झाली.

(मीरत येथील छावणीतील उठाव)
(Source : Wikipedia, Internet)

                  नेटिव्ह सैनिकांची दले दिल्लीत येऊन शेवटचा मुगल बादशहा बहादूरशहा जफर ह्याच्या नेतृत्वाखाली संघटित झाली. हा सर्व प्रसंग सुमारे तीनशे वर्ष आधी नॉस्त्रादेमसनी लिहून ठेवला होता. चौथ्या शतकातील तेरावी चतुष्पदी-

News of the greater loss reported, The report will astonish the army: Troops united against the revolted: The double phalanx will abandon the great one.  

     त्या बातमीमुळे खूप मोठे नुकसान होईल.
     सैनिकांना आपाल्याला फसविल्याची जाणीव होईल.
     सारी छावणी पेटून उठेल.
     पायदळाचे नेतृत्व थोर नेत्याकडे सोपविले जाईल.

(मुघल बादशहा बहादूरशहा जफर)
(Source : Wikipedia, Internet)

               पाश्चिमात्य अभ्यासकांच्या मते, ही चतुष्पदी भारतासंबंधी नाही आहे. पण मग कोणत्या घटनेसंदर्भात आहे, ह्याचं स्पष्ट उत्तरही त्यांच्याकडे नाही. भारतीय स्वातंत्र्यसमराच्या घटनेला ही चतुष्पदी अगदी समर्पकपणे जुळून येते.
                सर्वत्र उठावाचे विस्तव पेटले होते. काही ठिकाणी संस्थानिकांचे तर काही ठिकाणी ब्रिटिशांचे सैन्य वरचढ ठरत होते. अशातच ब्रिटिशांनी झाशीच्या किल्ल्याला वेढा दिला. झाशीच्या राणी लक्ष्मीबाई ह्यांनी प्राणपणाने किल्ला लढवला. सरळ मार्गाने किल्ला ताब्यात येत नाही हे पाहून ब्रिटिशांनी फंदफितुरीने झाशीच्या किल्ल्यात प्रवेश केला. राणी लक्ष्मीबाईंनी २३ मे १८५७ पासून अकरा दिवस अहोरात्र निकराने लढा दिला. नानासाहेब पेशव्यांचे सैन्य काल्पीपर्यंत येऊन पोहचले होते. परंतु आता मदतीसाठी थांबणे शक्य नव्हते. काही निवडक दासींना आणि सरदारांना बरोबर घेत, ब्रिटिशांचा वेढा फोडून लक्ष्मीबाईंनी काल्पीच्या दिशेने कुच केली.
               राणी लक्ष्मीबाईंनी पुरुषाचा पोषाख  केला होता. खमीज, तमामी पायजमा, अंगावर जाळीदार चिलखत, डोक्यावर मंदिल त्यावर शिरपेच, कमरेला दुशेल्यात रत्नजडित तलवार आणि जांबिया असा त्याचा पोषाख होता. दत्तक युवराजाला पाठिशी बांधून, घोड्यावर मांड घेतली आणि किल्ल्याच्या तटबंदीवरून घोड्याने उंच उडी घेतली. राणीसाहेबांचे हे धाडस पाहून ब्रिटिशही काही  क्षण अचंबित झाले. ब्रिटिशांची एक बटालियन राणी लक्ष्मीबाईंचा पाठलाग करत होती. लांबच्या दौडीनंतर थोड्या विश्रांतीसाठी राणी एका नदीच्या तीरावर थांबल्या. तेवढ्यात ब्रिटिशांचे घोडदळ पाठलाग करत येताना दिसले. लक्ष्मीबाईंनी लगेच घोड्यावर मांड टाकली आणि नदी पार करण्यासाठी नदीकडे वळल्या.

(झाशीची राणी लक्ष्मीबाई)
(Source : Internet)

              तोपर्यंत ब्रिटिशांच्या घोडदळाने त्यांना गाठलेच. लक्ष्मीबाईंनी अत्यंत चपळाईने मागे वळून बटालियनचे नेतृत्व करणार्‍या लेफ्टनंट बौकरवर वार केला. कोणाला काही कळायच्या आतच बौकरचे मस्तक धडावेगळे झाले. राणीने इतर काही स्वारांनाही यमसदनी धाडले. त्याच चपळाईने लक्ष्मीबाई मागे वळल्या, नदी पार करून वेगाने काल्पीच्या दिशेने दौड केली. नॉस्त्रादेमसनी ह्या घटनेच्या सुमारे तीनशे वर्षांपुर्वी हा घटनाक्रम डोळ्यांसमोर घडत आहे असा लिहून ठेवला. पहिल्या शतकातील शहाऐंशी क्रमांकाची चतुष्पदी-

When the great queen sees herself conquered,
She will show an excess of masculine courage.
On horseback, she will pass over the river.
Pursued by the sword.

पल्याला घेरण्यात आले आहे, हे त्या थोर राणीच्या लक्षात येईल.
ती खुप मोठे शौर्य गाजवेल.
घोड्यावर बसून नदी पार करेल.
तलवारी तिचा पाठलाग करतील.

               ब्रिटिशांनी फंदफितुरीने सर्व उठाव चिरडून टाकला. ११ ऑक्टोबर १८५७ रोजी बादशहा बहादूरशहा जफर याला रंगून येथे हद्दपार करण्यात आले. त्याच्या सर्व मुलांना ठार मारण्यात आले. तुरूंगवासात एकांतात राहणार्‍या बादशहाचा ७ नोव्हेंबर १८६२ रोजी मृत्यु झाला. पाश्चात्य अभ्यासक म्हणतात, कि नॉस्त्रादेमसने भारताबद्दल भाकित लिहिले नाही. पण त्यांनी बहुतेक खालील चतुष्पदीचा अभ्यास केला नसावा. चौथ्या शतकातील पासष्टावी चतुष्पदी-

(बादशहा बहादूरशहा जफरचा रंगूनला जाण्याआधीचा फोटो)
(Source : Wikipedia, Internet)


Towards the deserter of the great fortress, After he will have abandoned his place,
His adversary will exhibit very great prowess, 
The Emperor soon dead will be condemned.            

"त्या नेत्याला भव्य किल्ला सोडावा लागेल.
 त्याला त्याच्या जागेतून दूर हाकलले जाईल.
 त्याचे विरोधी अत्यंतिक कौर्य दाखवतील. 
 अज्ञात ठिकाणी राजाचा मृत्यु होईल."

            ह्यावरून समजतं की, नॉस्त्रादेमस भारताविषयी किती सज्ञान होते. पुढील भागात आपण दुसर्‍या महायुद्धाचा अभ्यास करू, त्यामुळे पुढे तिसर्‍या महायुद्धाचा अभ्यास करताना सोप्प जाईल. त्याचबरोबर दुसर्‍या महायुद्धामध्ये दबावतंत्राच्या युद्धनीतीमध्ये नॉस्त्रादेमसच्या भाकितांचा दोन्ही पक्षांनी कसा वापर केला ते सुद्धा पाहू.   
         

डुम्स डे किंवा अंतिम निर्णयाचा दिवस

Repost Original Date: 02 मार्च 2021            ख्रिश्चन, ज्यू आणि इस्लाम हे तिन्ही अब्राम्हीक धर्म मानले जातात आणि ह्या तिन्ही धर्मांच्या उग...