आज प्रत्येकजण शाळेपासून एक गोष्ट शिकत आलाय की माकडापासून मानव बनला. माकडसदृश्य प्राणी उत्क्रांत होत होत अवघ्या तीस हजार वर्षांपूर्वी संपूर्ण उत्क्रांत मानव तयार झाला. साधारणतः १८५८ मध्ये डार्विनने हा सिद्धांत मांडला. अनेकांनी तो उचलून धरला अनेकांनी फेटाळून लावला. पण मला नेहमी काही प्रश्न पडायचे. १८५८ च्या आधी कोणता सिद्धांत होता...?? ? जगाचं माहीत नाही पण आमच्या वेद-पुराणांमध्ये अनेक वैज्ञानिक सिद्धांत सांगितलेले आहेत. अगदी बिग बँग थेअरी सुद्धा सांगणारे आमचे वेद-पुराण हे माकडापासून मानव बनला हे का सांगत नाहीत...??? एक ना अनेक प्रश्न त्यांची उत्तरं त्या उत्तरातून आणखी प्रश्न ही साखळी चालूच होती आणि त्यानंतर मी एका निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचलो ते म्हणजे डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत थोतांड आहे...
हे कसे काय...??? विज्ञान इतकी वर्षे हे सगळं सांगतय ते खोटे कसे काय...?? हे समजून घेण्याआधी काही प्रश्न विचारतो... १. बारा अब्ज वनस्पती प्रजाती आणि तीन-चार अब्ज प्राणी प्रजातींपैकी फक्त माकडाच्या एका प्रजातीतूनच मानव उत्क्रांत का झाला.? २. माकडाची एकच प्रजाती का उत्क्रांत झाली.? ३. जर उत्क्रांतिवादाचा सिद्धांत इतका बरोबर आहे तर मग फक्त माकडच का इतर एकही प्राणी उत्क्रांत का नाही झाला.? ४. बाकीचे प्राणी जाऊद्या पण माकडाची एकच प्रजाती उत्क्रांत का झाली...??? इतर प्रजाती उत्क्रांत का नाही झाल्या.??? ह्या आणि अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं डार्विनची पालखी नाचावणारे देऊ शकत नाहीत...
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा डार्विनने उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला त्यावेळी जीन्स(गुणसूत्र) आणि DNA चा शोध लागला नव्हता. पण आजच जेनेटिक सायन्स असं सांगते की कोणत्याही प्राण्याच्या जीन्समध्ये कितीही काळ गेला तरीही नैसर्गिकरित्या बदल होऊ शकत नाही. अर्थात कृत्रिमरीत्या जीन्स बदलता येऊ शकतात. तितकं प्रगत विज्ञान आज उपलब्ध आहे पण अजूनही जगासमोर आणलं गेलं नाही. असो... जीन्समध्ये नैसर्गिकरित्या बदल होऊ शकत नाहीत म्हणजेच माकडाच्या जीन्स मध्ये बदल होऊन मानव बनू शकत नाही. बाह्य परिस्थितीनुसार एकाच प्राण्याच्या अनेक प्रजाती असू शकतात. उदा. माकडाच्या अनेक प्रजाती आहेत औरंग उटाण, गोरिला, चिंपांझी पण जीन्स मात्र माकडाचेच आहेत. अगदी मानावाच्याही अनेक प्रजाती आहेत. आफ्रिकन, युरोपियन, इंडो-एशियन, मंगोलियन पण जीन्स मात्र मानवाचेच आहेत. जर आधुनिक जेनेटीक सायन्सनुसार जीन्समध्ये नैसर्गिकरित्या बदल होतंच नसतील तर मग डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताला आधार काय उरला...??? ह्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर कोणताही डार्विनसमर्थक शास्त्रज्ञ किंवा इतिहासकार देऊ शकत नाही...
कोणत्याही लबाडीचे हेतू आणि परिमाण ठरलेले असतात तसेच ह्या डार्विनच्या लबाडीचेही आहेत. आधी परिणाम पाहुयात... डार्विनच्या लबाडीचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे कालगणने मध्ये आमूलाग्र गोंधळ निर्माण झाला. तीस हजार वर्षांपूर्वी प्रगत मानव निर्माण झाला ह्या एका वाक्याने सगळ्या प्राचीन ग्रंथांबद्दल आणि त्यांचा उत्पत्तीच्या काळाबद्दल संभ्रम निर्माण झाला. उदाहरण घ्यायचं झालंच तर भगवान महाविष्णूंच्या दशावताराचं घेऊ. पण हेच दशअवतार कालगणनेत निर्माण झालेला गोंधळही मिटवतात. ह्याबाबतीत दोन थेअरी आहेत पहिली अशी की पाच हजार वर्षांपूर्वी आर्य भारतात आले. ते भारतात येत असताना महाविष्णूचे पहिले तीन अवतार भारताबाहेर झाले आणि बाकीचे सहा अवतार भारतात आल्यावर झाले. वाक्य लक्षात ठेवा गेल्या पाच हजार वर्षांत सहा अवतार झाले, असे एक थेअरी सांगते. मग माझा प्रश्न असा की जर पाच वर्षांत सहा अवतार झाले तर एव्हरेज पकडला तर प्रत्येक हजार वर्षांमध्ये एक अवतार... आणि त्या गोळाबेरजेनुसार आता नववा अवतार मानले जाणारे गौतम बुद्ध ह्यांचा काळ सुरू असायला हवा... गेल्या हजार वर्षांपूर्वी श्रीकृष्ण अवतार आणि दोन हजार वर्षांपूर्वी राम अवतार असायला हवा. पण ह्यातील काही तरी तुम्हांला गेल्या हजार, दोन हजार वर्षांमध्ये दिसतं का...??? गोंधळात ना..??? खरी गंमत तर अजून पुढे आहे...
दुसरी थेअरी सांगते की श्रीकृष्ण अवतार इ.पु. ३००० वर्षांपूर्वी म्हणजे आजपासून ५००० वर्षांपूर्वी तर राम अवतार इ.पु. ५५०० वर्षांपूर्वी म्हणजेच आजपासून साधारणतः ७५०० वर्षांपूर्वी झाला. पहिली थेअरी सांगते की ५००० वर्षांपूर्वी आर्य भारतात आले त्यानंतर महाविष्णूचे चारपासून पुढचे अवतार झाले. दुसरी थेअरी सांगते की ५००० वर्षांपूर्वी श्रीकृष्ण अवतार आणि ७५०० वर्षांपूर्वी राम अवतार झाला...??? आता मोठा प्रश्न हा आहे की कोणती थेअरी खरी..??? आर्य नक्की कधी भारतात आले..??? आणि राम-श्रीकृष्ण अवतार कधी झाले..??? पाहिलंत ना किती मोठा गोंधळ निर्माण करून ठेवलाय डार्विनच्या सिद्धांताने...
आता परिणाम तर पाहिला आता हेतुकडे वळूयात... डार्विनने उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला १८५८ मध्ये. आणि हा कालखंडच फार महत्वाचा आहे. साधारणतः १७६४ पासून युरोपमध्ये एक गुप्त संघटना आकार घेत होती. जिचे उद्देश, हेतू फारच गुप्त ठेवले जात होते. ह्या गुप्त संघटनेचे नाव आहे इल्युमिनाटी आणि हिचा मुळ हेतू आहे जगावर राज्य करणे. (ही कोणतीही परिकल्पना किंवा हॉलिवूडच्या सिनेमाची पटकथा नाही.) ह्या संघटनेने तिच्या हेतूंना आकार देण्यासाठी सैतानी मार्गाची निवड केली आणि ह्या लोकांनी वसुंधरेच्या "लाखो वर्षांच्या इतिहासात" वेळोवेळी सपाटून मार खाल्लाय... मधल्या काळात मानव विज्ञानापासून दूर गेला होता. त्यामुळे ह्या संघटनेने अनेक वैज्ञानिकांना हाताशी धरून एक एक वैज्ञानिक प्रयोग जगासमोर आणायला सुरुवात केली. लोकांना विज्ञानाची इतकी भुरळ पडली की समोर येईल ती गोष्ट खरी मानायला सुरुवात केली. हेच ह्या संघटनेला हवे होते. ह्यामुळे झाले काय तर लोकांचा प्राचीन धार्मिक ग्रंथांवरील विश्वास उडाला. मग डार्विनचा सिद्धांत समोर आणला गेला. डार्विनच्या सिद्धांताचे दोन मूळ हेतु होते १. कालगणनेत गोंधळ निर्माण करणे. २. मानवजातीचा खरा इतिहास पुढे येणाऱ्या पिढ्यांना कळू न देणे. ज्या खऱ्या इतिहासामध्ये ह्या लोकांनी सपाटून मार खाल्ला आहे. तो लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून ही डार्विनची ही लबाडी रचली गेली. त्या खऱ्या इतिहासाचे अनेक संदर्भ बायबल मध्ये, भारतीय प्राचीन ग्रंथांमध्ये, ग्रीक आणि इजिप्त संस्कृती मध्ये आढळतात पण कालगणानेमध्येच गोंधळ निर्माण झाल्यामुळे आताच्या पिढ्यांना ह्या गोष्टी खोट्या वाटतात...
भारतामध्येही कोणी लबाड माणूस किंवा संघटना विज्ञानाचा दखला देऊन भारतीय प्राचीन ग्रंथांना रद्दी ठरवण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी डार्विन सारख्याच लबाडांचा आधार घेतात. मानव जातीचा खरा इतिहास जो बायबल, ज्यू धर्माचे प्राचीन ग्रंथ आणि भारतीय प्राचीन ग्रंथांमध्ये आहे तो जर समोर आला तर अध्यात्माचे महत्व अधोरेखित होईल. आणि ह्या संघटनेला जगावर राज्य करण्याचं जे त्यांचं स्वप्न खरं करायचं असेन तर अध्यात्माचे खच्चीकरण गरजेच आहे... त्यामुळे प्राचीन नोंदीबद्दल जमेल तितका संभ्रम निर्माण करण्यासाठीच डार्विनचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत अर्थात लबाडी रचली गेली. अशा प्रकारची लबाडी भारतात अगदी सत्ययुगापासून कधीच चालली नाही आणि ह्यापुढेही चालणार नाही. विज्ञान कितीही प्रगत झालं तरीही त्याला मर्यादा आहेत. आजच्या प्रगत जेनेटिक सायन्सनेच डार्विनची सगळी लबाडी उघड केली. अशा नाठाळ लोकांसाठी देऊळ बंद चित्रपटातील एक डायलॉग लिहून थांबतो. विज्ञान म्हणजे रेषाखंड.. 0 कडून 1 पर्यंत येऊन थांबणारे... 0101 बायनरी आणि अध्यात्म म्हणजे रेषा अनंताकडून अनंताकडे... आणि हा आमचा समृद्ध वारसा आहे त्यामुळे अश्या लबाड्या आम्हा भारतीयांपुढे चालणार नाहीत.
©सुमित शिर्के, खारघर


No comments:
Post a Comment