Friday, 28 February 2020

व्यापक कटाचा भाग...???

                "शराफत सें रहो, वरना बहुत पछताओगे तुम भी... परेशान हम अगर होंगे, सुकून ना पाओगे तुम भी..." "मुखालिफ लाख हो जाए, जो हम मैदान में आए, किसीसे डर नहीं सकते..." ह्या शेरो शायरी माझ्या नाहीत हो. फेसबुकवर एक व्हिडिओ बघितला त्यात एक मोहतरमा अशा मोठ्या मोठ्या गर्जना करत होत्या. तेच ऐकून विचारात गुंतलो आणि विचार करत मागे जात जात २००७ पर्यंत जाऊन पोहोचलो. २००७ चा संदर्भ शेवटी सांगेल. सध्या काही महिने मागे जाऊयात. भारतात सध्या जो गदारोळ सुरू आहे तो CAA कायदा संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यापासून सुरू आहे. समाजातील एका विशिष्ट वर्गाद्वारे देशात कुठे ना कुठे हा असंतोष धगधगत ठेवला जात आहे. मुळात CAA वरून गदारोळ करण्याची काहीच गरज नव्हती. CAA मुळे कोणाचेच नागरिकत्व जाणार नाहीये. तर पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश मधील अल्पसंख्याक लोकांना भारतीय नागरिकत्व मिळणार आहे.
               प्रश्न हा विचारला जातो की फक्त हिंदु, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन धर्मियांनाच का नागरिकत्व मिळणार...??? मुस्लिमांना का नाही...??? तर वरील सर्व धर्मीय लोकांना नागरिकत्व देतानाही काही अटी घातल्या आहेत. CAA मध्ये अंतर्भूत असलेले सर्व धर्मीय लोक पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान मध्ये अल्पसंख्यक आहेत. त्यांच्यावर ह्या तिन्ही देशांमध्ये धार्मिक अत्याचार झाले असतील तरच त्यांना भारतीय नागरिकत्व मिळणार आहे आणि डिसेंबर २०१४ पर्यंत जे लोकं भारतात आले आहेत त्यांनाच नागरिकत्व मिळणार आहार. ह्या सगळ्यामध्ये मुस्लिमांना नागरिकत्व देण्याचा प्रश्न येतोच कुठे.? वरील तिन्ही देशांमध्ये मुस्लिमांवरच अत्याचार (धार्मिक अत्याचार नव्हे.!) होत असतील तर ते अत्याच्यार करणारे कोण आहेत...??? पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले करणारे कोण आहेत...??? मुळात जर धर्माच्या आधारावर वेगळा देश मागितला आणि तो मिळवला तर पुन्हा पाकिस्तानी मुस्लिमांना भारतीय नागरिकत्व का द्यायचं...???
               आता काही लोकं NRC आणि NPR वरूनही राळ उठवत आहेत. अजून NRC चा ड्राफ्टही तयार झालेला नाही. त्यासंदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळाची एकही बैठक झालेली नाही तरीही NRC वरून गदारोळ सुरू आहे. तसेच NPR वरूनही नको तितके गैरसमज... सध्या व्हाट्सअप वर एक मेसेज फिरतोय. NPR चे प्रश्न असलेल्या कागदाचा एक फोटो आणि त्याबरोबर एक असा मेसेज की "महानगरपालिकेचे अधिकारी असा कागद घेऊन आले तर माहिती देऊ नका... पेपरवर सही करू नका..." अशाप्रकारच्या मेसेजवर विश्वास ठेवणाऱ्यांची आणि मेसेज पुढे फॉरवर्ड करणाऱ्यांची कीव येते. NPR चा सरळ अर्थ "जनगणना" असा आहे. ही दर दहा वर्षांनी नियमित होणारी प्रक्रिया आहे. आज जे लोक NPR ला विरोध करत आहेत त्यांनी दहा वर्षांपूर्वी म्हणजेच २०१० मध्ये ह्या NPR मध्ये नाव नोंदवलं होत. त्यामुळे NPR ला होणारा विरोध हा फारच हास्यास्पद आहे.
               पण ज्याप्रकारे हे विरोध प्रदर्शन होत आहे त्याची मोडस ऑपरेंडी फारच संशयास्पद आहे. CAA च्या विरोधात सुरू झालेल्या प्रदर्शनांनी आता वेगळं वळण घेतलं आहे. आता CAA, NRC आणि NPR च्या विरोधाच्या नाही तर आझादीच्या, फ्री काश्मीरच्या घोषणा दिल्या जात आहेत. शरजिल इमाम सारखा स्वतःला विद्यार्थी म्हणवणारा व्यक्ती ईशान्य भारताला मूळ भारत भूमिपासून तोडण्याची भाषा करतो. एका राजकीय पक्षाच्या व्यासपीठावरून पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा दिल्या जातात. भारताच्या तिरंग्यावर "ला इलाहीइल्लल्लाह" लिहिलं जात. एका विशिष्ट वर्गाचे लोक हातात दगड घेऊन रस्त्यावर उतरतात. दिल्लीमध्ये जी दंगल उसळली त्याची वेळही फार महत्वाची आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर असताना दंगल उसळते, हा निव्वळ योगायोग वाटतो का...???
               दिल्लीतील एका नगरसेवकाच्या घराच्या छतावर दगड, पेट्रोल बॉम्ब सापडतात. पोलिसांवर हल्ला होतो. एक दंगेखोर युवक (मिडीयाच्या भाषेत भटका हुआ नौजवान) पोलिसांवर बंदूक रोखतो. घरं, दुकानं पेटवली जातात. गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांची हत्या होते. पोलीस कॉन्स्टेबल मृत्युमुखी पडतात. हे सगळं एका रात्रीत घडणार नाही. ह्या सर्वांची मोडस ऑपरेंडी पाहिली तर लक्षात येतं की ह्या सगळ्याची तयारी खूप आधी पासून सुरू असावी. आणखी एक व्हिडिओ पाहिला त्यात एका इमारतीच्या छतावर लोखंडी स्ट्रक्चर बसवून त्यावर बेचक्या लावल्या होत्या आणि तिथून आजूबाजूच्या भागात दगड आणि पेट्रोल बॉम्बचा मारा केला जात होता. हे सगळं एका दिवसात होईल का...???
               काही मूठभर लोकं एका मोठ्या समाजाची दिशाभूल करून त्यांचा वापर करून घेत आहेत. दिल्लीतील चांदबाग परिसरात आयबी अधिकारी अंकित शर्मा ह्यांची निर्घृण हत्या केली गेली. त्यांच्या शरीरावर चाकूने ४०० पेक्षा अधिक वार केले गेले. ही बातमी वाचली तेव्हा डोळ्यासमोर औरंगजेब उभा राहिला. कारण औरंगजेब आता कोणी व्यक्ती उरली नसून तो विचार बनलाय आणि तोच विचार आज थैमान घालत आहे. एक नगरसेवक स्वतःच्या घराचा वापर छावणीसारखा करतो. चांदबाग भागातील स्थानिक सांगतात की दंगेखोर हे स्थानिक नसून बाहेरून आले होते. हे सर्व एका दिवसात होईल का...??? एक दंगेखोर पोलिसांवर बंदूक रोखतो. त्याच्या संपूर्ण हालचालींमधून त्याचं झालेलं प्रशिक्षण दिसतं. हेही एका दिवसात घडलं का...???
               मागे एक-दोन महिन्यांपूर्वी उत्तर भारतात झालेल्या हिंसाचाराला PFI नावाच्या संस्थेकडून आर्थिक पाठबळ मिळाल्याची बातमी आली होती. CAA च्या विरोधापासून सुरू झालेला घटनाक्रम पाहिला तर प्रश्न पडतो की हे सर्व सुनियोजित तर नाही ना...??? लोकसभेच्या निवडणूकीच्या आधी मी एक लेख लिहिला होता त्यात एक शंका व्यक्त केली होती. मोदी जर पुन्हा निवडून आले तर देशात गृहयुद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्याचाच हा भाग... CAA, NRC निमित्तमात्र आहे. मुळात CAA असो की NRC ह्या दोन्ही कायद्यांमुळे भारताच्या "सच्चा नागरिकाला" काहीच नुकसान नाही; मग तो हिंदू असोत की मुस्लिम. स्वतः पंतप्रधानांनी अनेकदा ह्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. तरीही काही मुठभर लोकं एका मोठ्या समाजाची दिशाभूल करतच आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी काही ठराविक लोकांची विधानं पाहिली तर लक्षात येईल की तयारी किती आधीपासून सुरू आहे.
               समाजाची दिशाभूल करून काही मुठभर लोकांना काय साध्य करायचं आहे...??? शरजिल इमामने पोलीस चौकशीत जे सांगितलं ते खरं तर नाही ना...??? गजवा-ए-हिंद म्हणजेच भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्यासाठीच हे प्रयत्न सुरू आहेत का...??? त्या सर्व प्रयत्नांना सुरुंग लागल्यामुळेच हे हिंसाचाराचे प्रयत्न होत आहेत का...??? एक ना अनेक प्रश्न उभे राहतात. इसिस सारख्या दहशतवादी संघटनेची राक्षसी महत्वाकांक्षा, तसेच पाकिस्तानचे गजवा-ए-हिंद बनवण्याचे प्रयत्न, त्या प्रयत्नांना भारतातील मुठभर लोकांचा असलेला पाठींबा आणि त्यासाठी गेल्या सत्तर वर्षांमध्ये झालेले प्रयत्न गेल्या पाच-सहा वर्षांपासून ढासळताना दिसत आहेत. भारतातील हिंसाचाराला आर्थिक पाठबळ कुठून मिळतंय ह्याचाही शोध व्हायला हवा. हा व्यापक कट किती व्यापक आहे ह्याचा अंदाज येईल. पाकिस्तान सध्या भिकेला लागलेला आहे. त्यामुळे पाकिस्तानातून इतक्या मोठ्या आर्थिक मदतीची शक्यता कमी आहे.तुर्की सोडला तर इतर कोणताही अरबी देश भारतासोबत असलेले संबंध बिघडतील अशी पावलं उचलणार नाही. तुर्की सध्या सीरियातील संघर्षात अडकून आहे. देशांतर्गत हिंसाचाराला एकच देश इतक्या मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य पुरवू शकतो. तो म्हणजे चीन... अर्थात हा माझा तर्क आहे पण मी त्यावर अगदीच ठाम आहे.
               आज जेव्हा जेव्हा मी भारतात अशाप्रकारे हिंसाचार, दंगल झालेली बघतो तेव्हा तेव्हा मला २००७ मधील एक घटना आठवते. ह्या घटनेला तेव्हाच्या भारत सरकारने फार गांभीर्याने पाहिले नव्हते. निषेधाचे दोन शब्द बोलून तेव्हा भारत सरकारने हा विषय सोडून दिला. तर घटना अशी होती. २००७ मध्ये चीनमधील एका प्राध्यापकाने चीनच्या ग्लोबल टाइम्स दैनिकात एक लेख लिहिला होता. आता एक गोष्ट लक्षात घ्या की चीनच्या वृत्तपत्रात तेच छापून येतं जे चीनच्या धोरणांशी सुसंगत असेल. त्या लेखात प्राध्यापक महाशय लिहितात की, "भारताच्या अंतर्गत घटकांना हाताशी धरून भारताचे २० ते ३० तुकडे करा..." चीनला जर महासत्ता बनायचे असेल तर भारत हा एकच अडसर आहे. त्यातही सध्या जगभरात तिसऱ्या महायुद्धाची धुमश्चक्री सुरू आहे. चीनच्या सर्व योजनांना सुरुंग लावण्याची क्षमता भारतामध्ये आहे. त्यामुळे अशा महत्वाच्या वेळी भारत अंतर्गत वादात अडकून पडला तर चीन-पाकिस्तानला त्यांचा राक्षसी महत्वाकांक्षा पूर्ण करणे सोपे जाईल...
               आज ज्या ज्या वेळी भारतात आझादीच्या घोषणा दिल्या जातात, त्या त्या प्रत्येकवेळी मला ग्लोबल टाइम्स मधील लेख आठवतो. गजवा-ए-हिंद बरोबर चीनच्या महत्वाकांक्षेमुळेच भारतातील समाजकंटकांना हाताशी धरलं जातंय का...??? हा प्रश्न उभा राहतो... आता शिजत असलेला व्यापक कट किती व्यापक आहे आणि किती आधीपासून आखला गेलाय ह्याचा अंदाज येतो. ह्या भारतवर्षाची सर्वात मोठी ताकद ही भारतामधील एकता आहे. भारतामध्ये दोन धर्मांमध्ये वाद निर्माण करून भारताचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुनियोजित रित्या केला जात आहे.. त्याला बळी पडायचं का...??? हा प्रश्न "प्रत्येक भारतीयाने" स्वतःला विचारावा. आणि माझ्या देशाचे तुकडे पाडण्याचे स्वप्न पाहणाऱ्या देशातील आणि देशाबाहेरील सर्वांना एकच सांगतो... "भारत एक मर्यादाशील अग्नी आहे; एक मर्यादाशील विस्तव आहे. त्या विस्तवातील निखारे वेगळे करण्याचा प्रयत्न कराल तर तुमचेच हात भाजतील. वेळप्रसंगी ह्या विस्तवाचा भडका होऊन तुम्हीच भस्मसात व्हाल. त्यामुळे माझ्या देशाच्या एकतेशी खेळू नका..."     
               

1 comment:

  1. छान लिहिलंय... 2007 च्या घटनेची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद !

    ReplyDelete

डुम्स डे किंवा अंतिम निर्णयाचा दिवस

Repost Original Date: 02 मार्च 2021            ख्रिश्चन, ज्यू आणि इस्लाम हे तिन्ही अब्राम्हीक धर्म मानले जातात आणि ह्या तिन्ही धर्मांच्या उग...