भारतवर्ष... आजचा भारत... आपला भारत देश.... असं म्हणतात पुर्वी आपल्या देशातून सोन्याचा धूर निघायचा. वैभवसंपन्न, बलसंपन्न असा आपला देश होता. दूरदूरपर्यंत आपल्या देशाची ख्याती होती. नालंदा, तक्षशिला सारख्या विद्यापीठांमध्ये शिकायला देशोदेशीचे विद्यार्थी येत असत. सर्व बलविद्यांमध्ये, विद्न्यानशाखांमध्ये माझा देश पारंगत होता. आसेतुहिमाचल पसरलेल्या माझ्या देशाकडे वाकड्या नजरेने पहायची कोणाची हिम्मत नव्हती. ज्याने हिम्मत दाखवली त्याची राखरांगोळी झाली.
पण नंतर असं काय घडल कि, आपल्या देशाला ग्रहण लागलं. ज्या देशातून सोन्याचा धूर वहायचा त्या देशाच्या मातीलाही काडीची किंम्मत राहिली नाही. आपल्याकडून अशा काय चुका घडल्या कि आपल्याला आपल्या सामर्थ्याचा विसर पडला. आपण का मागे पडलो? ह्याचा विचार आपण करायलाच हवा. त्यासाठीच हा ब्लॉग... आपल्या देशाची वैशिष्ट्ये, सामर्थ्य, मधल्या काळात आपल्याकडून झालेल्या चुका ते वर्तमानात आणि भविष्यकाळात जुळत चाललेल्या समीकरणांचा मागोवा आपण घेणार आहोत.
पण काहीही होवो... माझा देश महान होता, माझा देश महान आहे आणि माझा देश महान राहणार... १०८% आज माझ्या देशाचं वैभव परत आलयं. भारताशी संबंध सप्रस्थापित करण्यासाठी जगातील प्रत्येक देश उत्सुक आहे. आज आपण सर्व पुर्वीचा भारत अनुभव आहोत. आज आपल्या देशातील तरुणांचा बाहेरील देशांकडे कल जास्त दिसतो. मी त्यांना सांगू इच्छितो कि, आपला देश त्यांचापेक्षाही प्रगत आणि समृद्ध आहे. जगात आर्थिक उलथापालत होत असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था स्थिर होती. जगाने निर्बंध लादलेले असतानाही आपल्याकडे अणुतंत्रद्न्यान आहे. आपल्याकडे ब्राम्होस, अग्नी सारखी क्षेपणास्त्रे आहेत. अंतराळक्षेत्रातही आपण खुप पुढे आहोत. अमेरिकेच्या मंगळमोहिमेच्या खर्चात त्याच क्षमतेच्या ९ मंगळमोहिमा आपण करू शकतो हि आपल्यासाठी खुप अभिमानाची गोष्ट आहे.
आज आंतरराष्ट्रिय परिस्थितीचा मागोवा घेतला तर समजते की, जग १०८% तिसर्या महायुद्धाच्या काळात आहे़. ह्या तिसर्या महायुद्धामध्ये भारताची भुमिका अत्यंत महत्वाची आहे. अनेक देशांच्या धोरणांवर भारताच्या भुमिकेचा प्रभाव पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकन दौर मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला, ह्यावरूनच हे स्पष्ट होतं. मोदींच्या अमेरिकन काँग्रेसमधील भाषणाचे अमेरिकन लोकप्रतिनिधींनी ९ वेळा उभे राहून आणि ७२ वेळा टाळ्या वाजवून स्वागत केले. प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानाने फुलावा असा हा प्रसंग...
माझ्या देशाचं सामर्थ्य, वैभव असंच वाढत राहो, ही आई चण्डिकेच्या चरणी प्रार्थना...
जय हिंद... वंदे मातरम्...
श्रीराम...
अंबद्न्य...





वंदे मातरम
ReplyDelete